बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. स्वाइन फ्लू
Written By वार्ता|

मराठवाड्यातही आढळले 12 फ्लू रुग्ण

महाराष्ट्रात स्वाइन फ्लू वेगाने पसरत असून, मराठवाड्यात अनेक ठिकाणी या रोगाचे रुग्ण आढळले असून, यांची संख्या 12 वर पोहचली आहे.

सोमवारी मराठवाड्यात चार जणांना याची बाधा झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली होती. आज ही संख्या 12 वर गेली आहे.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका नर्ससह चार जणांवर उपचार सुरू असून, त्यांच्यात स्वाइनची लक्षणं आढळल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.