बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. स्वाइन फ्लू
Written By अभिनय कुलकर्णी|

स्वाईन फ्ल्यू : संघ शाखांना सुटी

राज्यभरात स्वाईन फ्ल्यू चा फैलाव वाढत असतानाच, पुणे शहरात सोमवारी आणखी तीन बळी नोंदवले गेल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगराने आपल्या शाखा, जाहीर कार्यक्रम व संघटनात्मक बैठकांना येत्या १७ तारखेपर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या शाखा या अतिशय प्रतिकुल परिस्थितीतही चालवल्या जातात असा लौकीक आहे. मात्र स्वाईन फ्ल्यू या रोगाची व्याप्ती अधिक वाढू नये म्हणूनच ही निर्णय घेतला गेल्याचे संघाच्या पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

देशभर थैमान घालणार्‍या स्वाईन फ्ल्यूमुळे पुण्यात सोमवारपर्यंत पाच बळींची नोंद झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी जमलेल्या गर्दीमुळे या रोगाचा फैलाव अधिक होतो हे लक्षात घेऊन शहरात सध्या सार्वजनिक ठिकाणे काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शाळा, महाविालये, चित्रपटगृहे इ. सार्वजनिक ठिकाणे काही काळ बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यातच लहान मुलांना या एच १ - एन १ या विषाणूंचा प्रादुर्भाव लवकर होत असल्याचेही आढळून आले आहे.

संघाच्या शाखेत येणार्‍या शालेय विार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या मुलांच्या आरोग्याचा विचार करून सध्या संघाच्या शाखांना सुट्टी ावी असा विचार करून संघाच्या पदाधिकार्‍यांनी हा निर्णय घेतला आहे. विविध सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही तुर्त स्थगित करावेत. तसेच संघाच्या पदाधिकार्‍यांच्या होणार्‍या नैमित्तिक बैठका देखील स्वाईन फ्ल्यू नियंत्रणात येईपर्यंत स्थगित कराव्यात असा निर्णय संघाच्या पुणे महानगर पदाधिकार्‍यांनी घेतला असल्याचे विशेष सूत्रांनी सांगितले.