गुरू रामदाससाहेब यांचा जन्म सप्टेंबर १५३४ मध्ये झाला. गुरू रामदास यांच्या वडिलांचे नाव बाबा हरीदास तर आईचे नाव माता दया कौर होते. घरची परिस्थिती गरिबीची होती.
गुरू रामदास यांचा विवाह भानीजी यांच्याशी झाला. त्यांना तीन अपत्ये झालीत. गुरू अमरदास यांच्या मार्गदर्शनाखाली ते शीख धर्माचे ज्ञान प्राप्त करायला लागले.
त्यांनी अल्पावधीतच गुरूंचा विश्वास संपादन केला. गुरू अमरदास यांनी धर्म प्रचार व प्रसारासाठी केलेल्या यात्रामध्ये गुरू रामदास त्यांच्या सोबत होते. गुरू अमरदेव यांनी त्यांना सप्टेंबर १५७४ मध्ये आपला उत्तराधिकारी नेमले.
गुरू रामदास यांनी रामदासपूरची कोनशीला ठेवली. रामदासपूर नंतर अमृतसर नावाने प्रसिद्ध झाले. त्यांनी अर्जुनसिंग यांना आपला उत्तराधिकारी नेमले. सप्टेंबर १५८१ रोजी ते अनंताच्या प्रवासास निघून गेले.