रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2022 - 2023
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (20:15 IST)

यंदाचा अर्थसंकल्पही सर्वसामान्य नागरिकाला समर्पित असेल; फडणवीसांचा दावा

devendra fadnavis
आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं कौतुक केलं. तसंच यंदाचा अर्थसंकल्पही सामान्य माणसाला समर्पित असेल असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.
 
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक पाहणी अहवाल २०२१-२२ आज लोकसभेत सादर केला. या अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२३ मध्ये देशाचा जीडीपी ८ ते ८.५ राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोने जीडीपी ग्रोथ ९.२ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला होता. मागील आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये ७.३ टक्के घसरण पाहायला मिळाली होती. आर्थिक पाहणी अहवालात आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जीडीपी ग्रोथ ९.२ टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
आर्थिक पाहणी अहवाल सादर झाल्यानंतर फडणवीस म्हणाले की, खरं म्हणजे आज जो आर्थिक पाहणी अहवाल आपण पाहिला. त्यातून आपल्या अर्थव्यवस्थेचं जे आऊटलूक आहे ते अत्यंत प्रॉमिसिंग दिसत आहे. मोठं रिव्हायव्हल त्यात पाहायला मिळत आहे. जी कोविडनंतर अत्यंत समाधानकारक बाब आहे. आतापर्यंत पंतप्रधान मोदींचं बजेट हे प्रो पिपल असं राहिलं आहे आणि मला विश्वास आहे की उद्या सादर होणारं बजेटही प्रो-पिपल असंच असणार आहे. हे सामान्य माणसाला समर्पित बजेट असेल. आमच्या इकॉनॉमिक रिव्हायव्हलला प्ल्यूएल करणारं बजेट असेल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय.