रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. अर्थसंकल्प 2023-24
Written By
Last Modified: बुधवार, 31 जानेवारी 2024 (13:05 IST)

Budget 2024:अर्थसंकल्पापूर्वीच सर्व प्रकारचे स्मार्टफोन होणार स्वस्त

भारत सरकारने अंतरिम अर्थसंकल्पापूर्वीच एक मोठी घोषणा केली आहे जी मेड इन इंडिया प्रकल्पासाठी भेटवस्तूपेक्षा कमी नाही. भारत सरकारने मोबाईल फोनच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या घटक आणि भागांवरील आयात शुल्क कमी केले आहे. आता मोबाईल पार्ट्सवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे.
 
सरकारने म्हटले आहे की सिम सॉकेट्स, मेटल पार्ट्स, सेल्युलर मॉड्यूल आणि इतर यांत्रिक वस्तूंवरील आयात शुल्क आता 5 टक्क्यांनी कमी केले जाईल.
 
भारत सरकारने मोबाईल फोनच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवर आयात शुल्क कमी केले आहे. आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे.
 
सरकारच्या या निर्णयामुळे भारतात त्यांच्या फोनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या खूप खूश होतील, कारण आता त्यांना कच्च्या मालाच्या आयातीवर कमी कर भरावा लागणार आहे. त्याचा परिणाम मोबाईल फोनच्या किमतीवरही दिसणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मोबाईल स्वस्त होणार आहेत.
 
काही दिवसांपूर्वी ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) च्या अहवालात असे म्हटले होते की स्मार्टफोन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्सवरील आयात शुल्क कमी केले जाऊ शकते. संशोधकांच्या मते, सरकारचे हे पाऊल मेक इन इंडियाला चालना देईल.

 Edited by - Priya Dixit