शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. अर्थसंकल्प 2023-24
Written By
Last Updated : बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 (14:19 IST)

Union Budget 2023 : निर्मला सीतारामन यांनी केल्या या महत्त्वाच्या घोषणा...

budget live
सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही
आयकराची मर्यादा 5 लाखांवरून 7 लाखांवर
यावर्षी 6.5 कोटी कर परतावा
अनेक वस्तूंना कस्टम ड्युटीतून सूट
मोबाईल पार्ट्सच्या आयातीला अनेक वस्तूंना कस्टम ड्युटीतून सूट
महिला सन्मान बचत पत्रची घोषणा
नवी लहान बचत योजना, दोन वर्षांसाठी गुंतवणूक करणार
2 लाखांपर्यंतची रक्कम 2 वर्षांसाठी ठेवता येणार, 7.5 टक्क्यांनी व्याजदर
पर्यटनाला आवश्यक सोयी-सुविधा पुरवल्या जाणार
50 पर्यटनाच्या स्थळांचा विचार केला जाणार
देखो अपना देश योजना कार्यान्वित करणार
स्वदेश दर्शन योजना कार्यान्वित,
ग्रामीण भारताचं दर्शन होण्याकरता योजना राबवणार
प्रदूषण करणारी जुनी वाहनं स्क्रॅप करणारी पॉलिसी राबवणार, आवश्यक तो निधी देणार
तरुणांना प्रोत्साहन देण्याकरता राष्ट्रीय शिक्षण धोरणांतून कौशल्यविकासावर भर देणार, त्यातून रोजगार निर्मितीचं शिक्षण देणार, व्यवसाय, व्यवस्थापनाचे धडे देणार
उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक असलेले स्किल विद्यार्थ्यांना देण्याकरता योजना राबवणार
30स्किल इंडिया सेटअप भारतभर स्थापन करणार
अर्थव्यवस्था पर्यावरणपूरक करण्यासाठी 19700 कोटींची तरतूद
2030 सालापर्यंत कार्बन निर्मिती कमी करण्याचा प्रयत्न
पर्यावरणपूरक विकास, 2070० सालापर्यंत कार्बन फ्री होण्याच्या दिशेने पावलं पडत आहे,
त्यासाठी योजना राबवल्या जात आहे
सात हजार कोटींचा खर्च करून ई-कोर्ट सुरू करणार
आर्टिकफिशिअल इंटेलिसन्स हे भविष्य आहे, त्यासाठी भारतातच संशोधन होणार
सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून एआयची इकोसिस्टम तयार करणार, करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचं
केवायसी पद्धत सोपी करण्यात येणार, डिजिटलच्या इंडियाला साजेशी सरलीकरण करण्यात येणार
डिजि लॉकर, आधार माध्यमातून माहिती एकत्रिकरण करणार
या सरकारी यंत्रणांसाठी पॅनकार्ड ओळख ठरणार
राज्य आणि शहरांना प्रोत्साहन देण्याकरता अर्बन प्लानिंग करावं, यातून शहरांचा आणि राज्यांचा विकास
शहरी भागातील लोकांना संधी मिळावी, सुविधा मिळावी याकरता शहरांना आणि राज्यांना प्रोत्साहन देणार
शहरी पायाभूत सुविधा निधी तयार केला जाणार, नॅशनल हाऊसिंग फायनान्स कमिटीकडून हा फंड मॅनेज केला जाणार,
शहर स्तरावरील संस्था या निधीचा वापर करून विकासाच्या योजना राबवू शकतील,
वार्षिक 10 हजार कोटींची तरतूद करणार
हाताने मैला उचलण्याची पद्धत बंद करून मशिनद्वारे काम करण्यासाठी योजना राबवणार
रेल्वे विभागासाठी 2.4 लाख कोटींचा निधी
आतापर्यंत सर्वांधिक मोठी आर्थिक मदत,
2013-14 च्या तुलनेतील 9 पट मदत
पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटींची तरदूत
जीडीपीच्या 3.3 टक्के असेल
सभागृहात मोदींच्या नावाचा जयघोष
शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी योजना राबवणार
शिक्षकांना उत्तरोत्तर शिक्षण मिळत राहील यादृष्टीने योजना राबवल्या जातील
लहान मुलं आणि शाळकरी मुलांसाठी नॅशनल डिजिटल लायब्ररी स्थापन करणार, भुगोल, गणितासह अनेक पुस्तके उपलब्ध होणार
याकरता नॅशनल बुक ट्रस्ट, चिल्ड्रन बुक ट्रस्ट यांना प्रोत्साहन देणार
पूर्वोत्तर राज्यांच्या विकासासाठी योजना राबवणार
कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन निधीची घोषणा
0-40 वयोगटातील लोकांचं हेल्थ स्क्रिनिंग होणार
खासगी मेडिकल कॉलेजसना प्रोत्साहन दिलं जाणार
मेडिकल टेक्नोलॉजी, मॅन्युफॅक्चरिंगला प्रोस्ताहन देणार
पीएम मत्स्य संपदा योजना राबवणार
6 हजार कोटी निधीची तरदूत, मासेमाऱ्यांना मदत करणार
कोणताही पीक घेण्याकरता शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरता डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जाईल, कषीपुरक स्टार्टअपसाठी मदत करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार
नव्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली
102 कोटी नागरिकांचं लसीकरण
81 लाख बचतगटांना मदत करण्याचा मानस, ग्रामीण भागातील स्त्रीयांना बळ देण्याचा प्रयत्न करणार
विश्वकर्मा कौशल्य विकास पीएम सन्मान
देशातील हस्तकलेला चालना मिळण्याकरता विश्वकर्मा कौशल्य विकास योजना राबवली, हेच कारागिर देशाचं चित्र रेखाटत असतात,
दर्जा, कला सुधारण्यासाठी भरीव निधी
मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली,
लोकोपयोगी योजनांमुळे दहाव्या क्रमांकावरून अर्थव्यवस्था पाचव्या क्रमाकांवर आली
जागतिक मंचावर भारताचं महत्त्वं वाढतं आहे, कोविन, युपीआयसारथ्या निर्णयामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेत भारताचं महत्त्व वाढत आहे
प्रत्येकाला अन्न मिळेल याची काळजी घेण्यात आली
कोविड काळात सर्वांना मोफत धान्य देण्यात आले
अंत्योदय योजना जानेवारी 2023 मध्ये आणली ज्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत अन्न पोहोचले
सपूर्ण जगात मंदी असताना आपल्याला जी२० चा मान मिळाला, संपूर्ण जगाच्या पटलावर आपण काय काम करतोय हे पोहोचवू शकलो, आपल्याला मोठी संधी मिळाली
जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्था मंदीतून जात असताना भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून उभी आहे
नुसती उभी नाही तर ज्यापद्धतीने पावलं उचलली आहे त्यामुळे भविष्यही उज्ज्वल दिसत आहे.
म्हणूनच मला खात्री वाटते की स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी आशीर्वाद देतील
बजेट 2023 लाइव्ह अपडेट्स: अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, सरकारच्या 7 प्राधान्यांमध्ये हरित विकासाचा देखील समावेश आहे. सरकारचे लक्ष जम्मू-काश्मीर, लडाख आणि ईशान्येकडे आहे. कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन निधीची घोषणा. हा निधी आधुनिक तंत्रज्ञानासाठी वापरला जाणार आहे.
 
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण ही एक संधी आहे जी वरील क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी परिवर्तनकारी ठरू शकते.
 
  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, गेल्या 9 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था आकाराने 10व्या ते पाचव्या क्रमांकावर आली आहे. आम्ही अनेक SDGs वर लक्षणीय प्रगती केली आहे. अर्थव्यवस्था खूप औपचारिक झाली आहे. योजनांच्या कार्यक्षम अंमलबजावणीमुळे सर्वसमावेशक विकास झाला आहे.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक व्यवस्थित झाली आहे. भारत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. दरडोई उत्पन्न दुपटीने वाढले. 2.2 लाख कोटी 11.4 कोटी शेतकऱ्यांना हस्तांतरित केले. 2022 मध्ये 1.24 लाख कोटी UPI व्यवहार झाले.
 
जगाने भारताला एक तेजस्वी तारा म्हणून ओळखले आहे, चालू वर्षासाठी आमची वाढ 7.०% एवढी आहे. महामारी आणि युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर जागतिक मंदी असूनही सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये हे सर्वोच्च आहे: एफएम सीतारामन
 
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की आम्ही सुधारणांवर लक्ष केंद्रित करून, मजबूत धोरणांवर अधिक चांगले करू शकलो, 28 महिन्यांत 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले.
 
Aam Budget 2023 Live:अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की जगात मंदी असूनही 7% ​​जीडीपी वाढीचा अंदाज आहे. जगाने भारताची ताकद ओळखली आहे.
 
समाजातील सर्व घटकांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करा, आर्थिक प्रगतीचे फायदे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा: अर्थमंत्री निर्मला सीतारामन
 
जगात मंदी असूनही 7% ​​GDP वाढीचा अंदाज; जगाने भारताची ताकद ओळखली आहे: अर्थमंत्री
 
अमृत काल में पहला बजट: वित्त मंत्री निर्मला सीतारमण