गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25
Written By
Last Modified: गुरूवार, 1 फेब्रुवारी 2024 (18:17 IST)

अर्थसंकल्प 2024 : आयकर असा आकारला जाणार

अर्थसंकल्प सादर होत असताना सर्वांचं लक्ष असतं दुसऱ्या टप्प्यात जाहीर होणाऱ्या आयकर म्हणजे इन्कम टॅक्सच्या बदलांकडे. पण यावेळी अंतरिम अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.
 
मग आता सध्या कररचना कशी आहे? नवीन आणि जुन्या प्रणालीतले टॅक्स स्लॅब्स काय आहेत?
 
न्यू टॅक्स रेजीम
या न्यू टॅक्स रेजीम म्हणजे नवीन कर प्रणालीत सर्वांनाच म्हणजे वैयक्तिक करदाते, सिनीअर सिटीझन्स - ज्येष्ठ नागरिक, सुपर सिनियर सिटीझन्स - अति ज्येष्ठ या सगळ्यांसाठी एकच कररचना आहे.
 
या न्यू टॅक्स रेजीममध्ये 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागत नाही.
3 ते 6 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर लागतो. (सेक्शन 87A अंतर्गत टॅक्स रिबेट उपलब्ध)
6 ते 9 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर लागतो. (सेक्शन 87A अंतर्गत 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स रिबेट उपलब्ध)
9 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15% कर लागतो.
12 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% कर लागतो.
15 लाखांवरील उत्पन्नावर 30 टक्के दराने कर आकारला जातो.
 
जुनी कर प्रणाली / ओल्ड टॅक्स रेजीम
जुन्या कर प्रणालीमध्ये 60 वर्षांवरील पण 80 वर्षांखालील ज्येष्ठ नागरिंकांचं 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे.
 
तर 80 वर्षांवरील अति ज्येष्ठांचं 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे.
 
इतरांसाठीची कर संरचना
 
2.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
2.5 ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% आयकर
5 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% आयकर आकारला जातो.
10 लाखांवरील उत्पन्नावर जुन्या कर प्रणालीनुसार 30% आयकर आकारला जातो.