शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (13:26 IST)

15 ते 18 वर्षे वयोगटातील मुले 1 जानेवारीपासून COWIN अॅपवर नोंदणी करू शकतील

देशात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. यासाठी 1 जानेवारीपासून नोंदणी करता येणार आहे. CoWIN प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ आरएस शर्मा म्हणाले की, यासाठी आपण  Cowin अॅपवर नोंदणी करू शकाल.
डॉ. आर.एस. शर्मा यांनी सांगितले की नोंदणीसाठी 10वी ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. कारण काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र नसतील.
 
लस नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या .
1 सर्व प्रथम Cowin App वर जा. मोबाईल क्रमांक टाका. ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करा.
2 आता आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा निवडा.
3  आपण निवडलेल्या आयडीचा नंबर, नाव टाका. त्यानंतर लिंग आणि जन्मतारीख निवडा.
4 सदस्य जोडल्यानंतर, आपण आपल्या  जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.
5 आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा. केंद्रावर जाऊन लसीकरण करा.
6 लसीकरण केंद्रावर, तुम्हाला रिफ्रेन्स आयडी आणि सिक्रेट कोड सांगावा  लागेल. जे आपण नोंदणी केल्यावर मिळतो.
7 त्याचप्रमाणे, आपण आपल्या  लॉगिनमध्ये इतर सदस्य जोडून त्यांच्या  लसीकरणाची नोंदणी करू शकता.
 
देशात सध्या 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी  कोरोनाच्या वॅक्सीनला  मान्यता देण्यात आली आहे. अद्याप त्यापेक्षा कमी वयातील मुलांच्या वॅक्सिनेशन साठी सरकारने काही निर्णय घेतला नाही.