शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (22:42 IST)

आधार कार्डमधील फोटो बदलण्यासाठी ही प्रक्रिया अवलंबवा

आधार कार्ड हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण तो भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक कागदपत्र बनला आहे. मुलांना शाळेत प्रवेश मिळणे असो, बँक खाते उघडणे असो , पासपोर्ट काढणे असो  यापासून अनेक ठिकाणी आधार कार्ड आवश्यक आहे. जिथे अनेक ठिकाणी आधार कार्डाची गरज आहे, तिथे आपला फोटो आधार कार्डवरच आहे.  आपल्यालाही आपल्या आधार कार्डवरील फोटो आवडला नसेल, तर आता आपल्या कडे तो बदलण्याचा पर्याय आहे. आज आम्ही आपल्याला या साठी एक पर्याय  सांगत आहोत ज्याद्वारे आपण आधारकार्डावरील आपला सध्याचा फोटो कोणत्याही अडचणीशिवाय आणि कागदपत्रांशिवाय सहजपणे बदलू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही पद्धत: 
 
आधारमध्ये फोटो बदलण्याची ही सर्वात सोपी प्रक्रिया आहे 
*  यासाठी, सर्वप्रथम आपल्याला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट (uidai.gov.in) मधील Get Aadhaar  section ला  जाऊन आधार नोंदणी फॉर्म किंवा सुधारणा/अपडेट फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
 
*  हा फॉर्म पूर्णपणे भरा आणि आधार कायमस्वरूपी नोंदणी केंद्रात बसलेल्या एग्झिक्युटीव्ह ला द्या.
 
*  यानंतर आता आपल्याला आपल्या  बायोमेट्रिक डिटेल्स एक्झिक्युटिव्हला द्यावी लागतील. जरआपल्याला फॉर्म डाऊनलोड करायचा नसेल तर तो फॉर्म केंद्रावरही मिळेल. 
*  यानंतर, आधार नोंदणी केंद्रावरील कर्मचारी आपले लाईव्ह फोटो घेईल. 
 
* आधार मधील फोटो बदलण्यासाठी आपल्याला केंद्रावर 25 रुपये भरावे लागतील ज्यामध्ये कराचा समावेश आहे. 
 
*  पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला एक पोचपावती स्लिप मिळेल, ज्यामध्ये अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) असेल. आपण URN वापरून आधार कार्डची अपडेटेड स्थिती तपासू शकता. 
 
*  आधार कार्डमध्ये आपला फोटो अपडेट केल्यानंतर आपण आधार कार्ड  फक्त ऑनलाइन डाउनलोड करू शकता.
 
आधारमध्‍ये फोटो अपडेट केल्‍यानंतर, तो घरी बसून डाउनलोड करा  
1. आधारमध्‍ये फोटो बदलण्‍याच्‍या विनंतीवर प्रक्रिया केल्‍यानंतर, आपण अपडेट केलेले आधार कार्ड ऑनलाइन सहज डाउनलोड करू शकता.
 
2. अपडेट केलेले आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला  UIDAI पोर्टलला भेट द्यावी लागेल.
 
3. येथे आपण कोणतेही सामान्य आधार कार्ड किंवा मास्क केलेले आधार कार्ड डाउनलोड करून  निवडू शकता आणि ते डाउनलोड करू शकता आणि ते आपल्याकडे सुरक्षित ठेवू शकता.