संबंधित माहिती
- प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2022:योजना पात्रता,फायदे, उद्दिष्टये, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
- EPFO तुमच्या या चुकांमुळे बंद होऊ शकते पीएफ खाते, जाणून घ्या पुन्हा कसे सक्रिय करता येईल
- PM किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल, आता हे काम तुम्ही आधार कार्डाशिवायही करू शकता
- Agneepath Yojana 2022:अग्निपथ योजना म्हणजे काय?, पात्रता,फायदे, उद्दिष्टये, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना 2022 : Jeevan Prakash Yojana,ऑनलाइन आवेदन प्रक्रिया, पात्रता, फायदे, आवश्यक कागदपत्रे, उद्देश जाणून घ्या
FASTag खरेदी करताना सावध रहा, संपूर्ण माहिती जाणून घ्या
नेशनल हायवेवरुन प्रवास करताना वाहनांवर FASTag असणं गरजेचं आहे. आता देशभरात सगळ्या टोल नाक्यांवर FASTag पद्धतीनेच टोल स्वीकारलं जात असून हे बंधनकारक झाले आहे.
फास्टॅग अनिवार्य झाल्यामुळे फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही अशात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबद सावध केले आहे. NHAI किंवा IHMCL च्या नावानं अगदी हुबेहुब असे बनावट फास्टॅग विकले जात आहेत. पण ते वैध नाहीत, असा अलर्ट देण्यात येत आहे.
या प्रकारे खरेदी करा वैध फास्टॅग
वैध फास्टॅग फक्त IHMCL च्या अधिकृत वेबसाईटवरच मिळेल. किंवा आप आपण MyFASTag App मार्फत खरेदी करु शकता. शिवाय काही बँक किंवा अधिकृत पीओएस एजंटकडूनही खरेदी करता येईल. या बँकांची यादी IHMCL च्या वेबसाईटवर दिली गेली आहे.
मदत
फास्टॅगसंबंधी फसवुणकीची कोणतीही घटना समोर आल्यास NHAI च्या 1033 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा. किंवा [email protected] वर तक्रार नोंदवता येईल.
फास्टॅगची किंमत आणि रिचार्ज
फास्टॅगची किंमत वाहनाचा प्रकार आणि ज्या माध्यमातून खरेदी करताय त्यावर अवलंबून आहे. कारण प्रत्येक बँकेचे फास्टॅग शुल्क आणि सिक्युरिटी डिपॉझिट्स याचे वेगळे नियम आहेत.
फास्टॅग रिचार्ज करण्यासाठी दोन पर्याय आहेत. फास्टॅग ज्या बँकेकडून घेतला असेल, त्या बँकेचं फास्टॅग वॉलेट वापरणं. किंवा पेटीएम किंवा फोनपे यांसारख्या मोबाइल वॉलेट अॅप्सचा वापर करुन रिचार्ज करता येईल.
