1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
  4. Railway rules change after 10 pm

रात्री १० नंतर रेल्वेचे हे नियम बदलतात, माहिती आहे का तुम्हाला?

रात्री १० नंतर रेल्वेचे  काही नियम बदलतात, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असते. काही नियम इतके चांगले असतात की ते प्रवाशांना आरामात प्रवास करण्यास मदत करू शकतात.
रेल्वे बोर्डाचे हे विशेष नियम जाणून घेतल्याने तुमचा प्रवास अत्यंत सुरक्षित आणि आरामदायक होतो. चला तर जाणून घेऊया की रात्री १० नंतर रेल्वेचे कोणते नियम बदलतात.
 
रात्री १० नंतर रेल्वेचे दिवे बंद करण्याचा नियम
रेल्वेच्या नियमांनुसार, रात्री १० नंतर रेल्वेचे दिवे बंद केले जातात. प्रवाशांना कोणत्याही अडथळ्याशिवाय शांत झोप आणि विश्रांती मिळावी, हे सुनिश्चित करण्यासाठी हा नियम तयार करण्यात आला आहे.
 
वरच्या बर्थवरील प्रवाशांसाठी वेळेची मर्यादा
जर तुमच्याकडे मधल्या बर्थचे तिकीट असेल, तर तुम्ही तुमची सीट फक्त रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेतच उघडून झोपू शकता. या वेळेनंतर, तुम्ही सीटची पाठ खाली करणे आवश्यक आहे, जेणेकरून खालच्या बर्थवरील प्रवासी आरामात बसू शकतील.
 
लाऊडस्पीकर, मोठा आवाज आणि संगीत यांना सक्त मनाई आहे
रात्री १० नंतर संगीत ऐकण्यास, व्हिडिओ पाहण्यास किंवा मोबाईल फोनवर मोठ्या आवाजात बोलण्यास सक्त मनाई आहे. सहप्रवाशांच्या झोपेत व्यत्यय आणल्यास रेल्वे कर्मचारी किंवा टीटीई (TTE) यांच्याकडून कारवाई केली जाऊ शकते.
 
रात्री टीटीईद्वारे तिकीट तपासणीवर बंदी
सर्वसाधारणपणे, रात्री १० नंतर, कोणताही टीटीई तुमच्या सीटवर येऊन तिकीट किंवा ओळखपत्र मागू शकत नाही. झोपलेल्या प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
LIVE: गणेशोत्सव २०२६ निमित्त कोकण प्रवाशांसाठी ५,२२० विशेष एसटी बस धावणार