डिजीटल पेमेंट्सचे प्रकार आणि वापरताना घ्यावी अशी खबरदारी

Last Modified मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (11:23 IST)
सध्याच्या काळात भारतात सर्वीकडे डिजीटल पेमेंट मोठ्या प्रमाणात केले जात आहे. जसं-जसं डिजीटल पेमेंट आपली गती वाढवत आहे, त्याच प्रमाणे डिजीटल फसवणूक देखील वाढत आहे. ग्राहकाला ओळखणे कठीण होत आहे की कोणत्या डिजीटल पर्यायाने त्यांनी पेमेंट करावे आणि कोणत्या पर्यायाला दुर्लक्षित करावं.
ऑनलाईन खरेदारी करताना देखील त्यांच्या समोर अशे बरेच पर्याय येतात, त्यामुळे त्यांचा गोधंळ होणं साहजिकच आहे. चला जाणून घेऊ या की भारतात कोण कोणती डिजीटल पेमेंट वैध आहे आणि कोणत्या डिजीटल पेमेंट चा वापर कुठे करावा.

* बँकिंग कार्ड्स-
जेव्हा आपण एखाद्या बँकेत आपले खाते उघडता तेव्हा आपल्याला डेबिट कार्ड दिले जाते, ज्याला आपण एटीएम कार्ड देखील म्हणतो. या शिवाय बँक आपल्याला क्रेडिट कार्ड देखील देतात, पण आपल्याला हा विचार करावयाचा आहे की आपल्याला खरंच क्रेडिट कार्डाची गरज आहे का? जर आपण डिजीटल पेमेंट मध्ये खूप आरामदायक नसाल! तर ते न घेणे चांगले. लक्षात ठेवा की क्रेडिट कार्ड पेमेंट मध्ये लोक नुकसान देखील सोसतात कारण याचे नियम फार क्लिष्ट असून या वर लागणारे शुल्क जास्त प्रमाणात आकारले जातात.
क्रेडिट आणि डेबिट दोन्ही प्रकारच्या कार्ड्स मध्ये आपले पिन खूप महत्त्वाचे असतात, हे कोणा बरोबर देखील सामायिक करू नये.

* यूपीआय पेमेंट पर्याय -
UPI म्हणजे युनिफॉर्म पेमेंट इंटरफेस आपल्याला त्वरितच पैसे हस्तांतरित करण्यास किंवा प्राप्त करण्यास सवलत देतो. यात सरकारने पुरविल्या सेवाच नव्हे तर गूगलपे, (GooglePay) फोनपे (PhonePe), पेटीएम पेमेंट्स बॅंक्स इत्यादींचा समावेश आहे. हे मोठ्या प्रमाणात ग्राहकांना UPI शी जोडत आहे. तथापि, यातही आपल्याला फसवेगिरी पासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण बऱ्याचदा आपल्याला फिशिंगसाठी बऱ्याच ठिकाणाहून कॉल येतात अनवधानामुळे आपली फसगत होऊ शकते.

यूपीआय आपल्याला पेमेंट्सची सवलत देतो, पण यामुळे फसवणुकीचे प्रमाण देखील वाढतच आहे. म्हणून आवश्यक आहे की आपण आपल्या पिन ला सुरक्षित ठेवणे आणि आपला फोन कोणालाही न देणे.

* एईपीएस(AEPS) आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम -
या द्वारे आपण आपल्या केवायसी ची माहिती देऊन आपल्या खात्याशी आधार लिंक करू शकता. 1 किंवा 2 मिनिटातच हे सक्रिय होत या साठी आपल्याला मायक्रो एटीएम लागतं आणि आपल्या उपस्थितीत पैसे निघून जातात. पण लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की आपण अधिकृत ठिकाणावरूनच या सर्व्हिसचा वापर करावा. कुठेही केल्याने फसवणूक होण्याचा धोका असतो.
* मोबाईल वॉलेट -
मोबाईलमध्ये पेटीएम सर्वात लोकप्रिय मानले जाते. नोटबंदीच्या काळापासूनच मोबाईल वॉलेट खूप लोकप्रिय आहे आणि याच्या
माध्यमातून आपण कोणालाही पैसे देऊ शकता. आता तर याद्वारे कोणत्याही बँकेच्या खात्यात पैसे देखील हस्तांतरण करू शकतो. याचे शुल्क आकारण्यात येतात. मोबाईल वॉलेट, ऑनलाईन व्यवहारात खूप लोकप्रिय आहेत.

* इंटरनेट बँकिंग -
आपल्याला त्वरित पैसे हस्तांतरित करावयाचे असेल किंवा एनएफटी करायची असल्यास आपण हे बँकिंगचे काम इंटरनेट बँकिंगच्या साहाय्याने करू शकता.या मध्ये कोणत्याही बॅंकेतून इंटरनेट बँकिंग साठी अर्ज केल्यानंतर आपल्याला एक यूजर नेम आणि पासवर्ड मिळतं आणि त्याने आपण लॉगिन करून बँकेच्या इंटरनेट बँकिंग वेबसाइट वर भेट देता आणि सर्व बँकेचे व्यवहार करता.
* पीओएस(POS) म्हणजे पॉइंट ऑफ सेल -
आपण बऱ्याचदा बघता की शॉपिंग मॉल्स मध्ये खरेदी करताना आपल्या बँकेच्या कार्डला स्क्रॅच करून मशीनने पैसे घेतले जातात. या मशीनला पॉइंट ऑफ सेल म्हणतात. वेगवेगळ्या बँक हे मशीन आपल्या ला देतात जेव्हा आपण एका व्यवसायीच्या रूपाने ओळख दाखवून याची मागणी करता.

समजा की आपण एखादे स्टोअर उघडत आहात आणि आपण बँकेकडून पीओएस ची मागणी करता आणि त्या मशिनी मधून आपण कोणतेही कार्ड स्क्रॅच करून पैसे घेऊ शकता.

एका ग्राहक म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की कार्ड स्क्रॅच करताना आपले पासवर्ड काळजीपूर्वक घाला. जर आपल्या परवानगी शिवाय आपल्या खात्यामधून रक्कम वजा झाली असल्यास त्वरितच आपल्या बॅंकेशी संपर्क साधावा.

वरील पेमेंट पद्धतीच्या व्यतिरिक्त USSD बँक प्रीपेड कार्ड आणि मायक्रो एटीएम देखील मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात, परंतु डिजीटल पेमेंट मध्ये हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की हे पूर्णपणे सुरक्षित आहे किंवा नाही. नाही तर आपण फसवणुकीला बळी पडू शकता.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

मोबाईल हँग होण्यापासून कसे वाचवाल जाणून घ्या

मोबाईल हँग होण्यापासून कसे वाचवाल जाणून घ्या
आपण स्मार्टफोन वापरता तर आपल्या समोर फोन हँग होण्याच्या समस्या येतच असणार

वाचा , राज्यात लॉकडाऊन होणार का?

वाचा , राज्यात लॉकडाऊन होणार का?
राज्यातला वाढता कोरोना प्रादुर्भाव बघता लवकरच राज्य सरकार १० दिवसांसाठी लॉकडाऊन करणार ...

कोरोना नियंत्रणासाठी केंद्राकडून पथकं येणार

कोरोना नियंत्रणासाठी केंद्राकडून पथकं येणार
राज्यात जवळपास पाच महिन्यानंतर २४ तासांच्या अवधीत १० हजारांपेक्षा करोनाचे रुग्ण आढळून आले ...

मालेगावात माजी आमदाराने घेतली जाहीर सभा, गुन्हा दाखल

मालेगावात माजी आमदाराने घेतली जाहीर सभा, गुन्हा दाखल
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जाहीर सभा घेणे आणि सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई असताना

.खासदार प्रज्ञासिंह ठाकूर कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

.खासदार प्रज्ञासिंह ठाकूर कोकिलाबेन रुग्णालयात दाखल
भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने मुंबई येथे ...