मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (09:52 IST)

कोरोना काळात कार किंवा बाइक चालवताना या गोष्टी लक्षात ठेवा

सध्या कोरोना पासून वाचण्यासाठी सर्व प्रकारच्या खबरदारी घेण्यात येत आहेत. जेणे करून या विषाणूंचा धोका होऊ नये. तसेच प्रवासाच्या दरम्यान प्रत्येक टप्प्यावर कोरोना संक्रमणापासून संरक्षण आवश्यक आहे. लोक आता हळू-हळू घराबाहेर पडत आहे. बाइक्स आणि कारने बाहेर जात आहेत. अश्या परिस्थितीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जर आपण आपल्या कार किंवा बाइकचा वापर करत असाल तर आपल्याला या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
 
1 आपण कार मध्ये असाल किंवा बाइक वर शक्य असल्यास एकटेच जावे.
 
2 जर आपल्या बरोबर एखादा प्रवासी असल्यास, लक्षात ठेवा की दोघांनी मास्क घातलेला आहे.
 
3 कार मध्ये दोघे एकत्र बसू नये, एक पुढील सीट वर तर दुसऱ्यानं मागील सीट वर बसावे. जेणे करून योग्य अंतर राखता येईल.
 
4 कारचे दार उघडल्यावर आपल्या हातांना लगेच सेनेटाईझ करावे.
 
5 कारच्या आत ही मास्क काढू नये आणि जेवढे शक्य असल्यास कमीत कमी संवाद साधावा.
 
6 कार मधून खाली उतरल्यावर देखील आपल्याला आपल्या हाताला सेनेटाईझ करावयाचे आहे.
 
7 बाइक वर जात असाल तर, मास्कच्या वर हेलमेट आवर्जून घालावे.
 
8 आपल्या बाइकच हॅण्डलला व्यवस्थितरीत्या सेनेटाईझ करावे. नंतर बाइकला स्पर्श करावे.
 
9 रेड लाइट असल्यास दुसऱ्या वाहनांपासून अंतर राखावे, कारण एखादाला खोकला आला किंवा शिंक आली तर संसर्गाचा धोका होऊ शकतो. 
 
10 जेव्हा आपण आपल्या ठिकाणी पोहोचाल, बाइक वरून उतरल्यावर आपण आपल्या हाताला सेनेटाईझ करावे.
 
11 बाइकच्या हॅण्डलला हात लावल्यावर आपले हात आपल्या चेहऱ्याला लावू नका. प्रथम हातांना स्वच्छ करा.
 
आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी आपणास या सवयी अंगीकृत करणे आवश्यक आहे. जेणे करून या कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये आणि या पासून वाचता येऊ शकेल.