सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (16:17 IST)

WhatsApp Tips: व्हॉट्सअॅप वर आलेला मेसेज बनावट आहे की खरा, असे ओळखा

व्हॉट्सअॅप टिप्स: सध्या इंटरनेटच्या युगात मेसेजचा पूर सर्व सोशलमिडीयावर आला आहे.या मध्ये काही मेसेज चांगले असतात तर काही बनावटी असतात.व्हॉट्सअॅप देखील यापासून सुटले नाही.व्हॉट्सअॅप ला करोडो युजर्स व्हॉट्सअॅपशी जुडलेले आहे.या प्लॅटफॉर्मवर लाखो फोटो, व्हिडिओ ,टेक्स्ट मेसेज दररोज शेअर केले जातात.
 
बर्‍याच लोकांसह असे घडते की ते असा व्हिडिओ, मेसेज फॉरवर्ड करतात जे बनावट आहे. अनेकवेळा असे पाहिले गेले आहे की बनावट व्हिडिओ किंवा बनावट फोटो पाहिल्यावर तो व्हॉट्सअॅपसह इतर सोशल मीडियावर द्रुतगतीने व्हायरल होतो. त्यामुळे आज आम्ही आपल्याला काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहोत. या टिप्स आपल्याला  व्हॉट्सअॅपवर बनावट असलेले साहित्य ओळखण्यास मदत करतील.
 
* लक्षात ठेवा की बहुतेक बनावट बातम्या एडिडेट फोटो आणि व्हिडीओद्वारे पसरवल्या जातात.
* म्हणूनच हे अत्यंत महत्वाचे आहे की जर कोणत्याही घटनेशी संबंधित कोणताही व्हिडिओ किंवा फोटो व्हॉट्सअॅपवर आढळला तर त्याची विश्वसनीयता निश्चितपणे तपासा.
* कोणत्याही बातमीची सत्यता तपासण्यासाठी इंटरनेटची मदत घ्या.
*  इंटरनेटवर ठोस माहिती उपलब्ध नसेल, तर आपण काही लोकांशी त्याबद्दल बोलू शकता. असे केल्याने तुम्हाला व्हॉट्सअॅपवरील बातम्या खऱ्या आहेत की बनावट हे जाणून घेता येईल.
 
जर आपल्याला फॉरवर्ड मेसेज आला तर हे करा-
 
* जर आपल्याला व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड मेसेज आला तर समजून घ्या की आपल्याला  सर्वात आधी या मेसेजचे तथ्य तपासायचे आहे.
* जर आपल्याकडून अशी कोणतीही बातमी पाठवली गेली असेल तर त्याची माहिती गुगलवर शोधा.
* आपण पीआयबीच्या अधिकृत ट्विटर अकाउंट ला भेट देऊन देखील तपासू शकता.
* सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांचे पीआयबी फॅक्ट चेकिंग करते.
 
वेगळे दिसणारे मेसेज-
 
* जर आपल्याला  असा कोणताही संदेश मिळाला ज्यामध्ये शब्दांमध्ये चूक असेल तर सावध व्हा.असे संदेश बनावट असतात.

*अशा प्रकारचे मेसेज चुकून देखील फॉरवर्ड करू नका.