गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (13:38 IST)

आज मुस्लिम महिला देखील मोदी-मोदी करत आहेत: नकवी

mukhtar abbas naqvi
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की पंतप्रधान मोदींनी मुस्लिम महिलांसाठी अनेक कल्याणकारी कामे केली आहेत. आज मुस्लिम महिला देखील मोदी-मोदी करत आहेत. त्यामुळेच दांभिक राजकीय कार्यक्रम चालवणाऱ्या लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारण त्यांना संभ्रमाचे तसेच भीतीचे वातावरण निर्माण करायचे होते.
 
उल्लेखनीय आहे की पंतप्रधान मोदींनी यूपीमधील फतेहपूर येथे एका रॅलीला संबोधित केले तेव्हा तिहेरी तलाकविरोधातील कायद्याला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांवर निशाणा साधला. ते म्हणाले होते की तिहेरी तलाकला विरोध करणारे पक्ष स्वार्थी आहेत. ते लोक त्यांना मतदान करणाऱ्यांचा देखील विचार करत नाहीत.
 
काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले होते की काही नेत्यांची विचारसरणी कुटुंबापासून सुरू होते आणि कुटुंबावरच संपते. तर जनतेच्या हिताचा विचार करण्याऐवजी कुटुंबाच्या हिताचा विचार करणारे पक्ष यूपीसारखे मोठे राज्य सांभाळू शकत नाही यामुळे यूपी पुन्हा एकदा योगींची वाट बघत आहे.