सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. मणिपूर विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (14:12 IST)

राजनाथ सिंह यांनी इंफाळ येथील कारगिल युद्धातील शहीदांच्या घरी जेवण केले

rajnath singh
Manipur Assembly Election 2022 मणिपूर विधानसभा निवडणुकीसाठी 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी मतदान होणार आहे. अशात संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह पक्षाच्या प्रचारासाठी मणिपूरमध्ये आहेत आणि त्यांनी इंफाळमध्ये भारतीय लष्करातील एका शहीद जवानाच्या घरी पोहोचून जेवण केले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग देखील उपस्थित होते.
 
राजनाथ सिंह यांनी कारगिल युद्धात शहीद झालेले भारतीय लष्कराचे जवान युम्नाम कलेशोर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी ते त्यांच्यासोबत जेवले देखील.
 
मणिपूरमधील 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार असून पहिल्या टप्प्यासाठी 28 फेब्रुवारीला आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 5 मार्चला मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.