CM बिरेन म्हणाले, भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल
Manipur Election 2022 मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ 19 मार्च 2022 रोजी संपत असून 28 फेब्रुवारी रोजी राज्यात पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. मणिपूरच्या मुख्यमंत्री यांना यावेळीही राज्यात भाजपचेच सरकार येणार याची खात्री आहे.
काही मतदानपूर्व सर्वेक्षणांनी मणिपूरमध्ये त्रिशंकू सरकार येण्याची शक्यता वर्तवली आहे. सर्वेक्षणानुसार निवडणुकीत त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता वर्तवली जात असताना सीएम बिरेन सिंह यांनी या सर्व शक्यता चुकीच्या असल्याचे सांगतिले. मणिपूरमध्ये भाजपचा विजय होईल याची मला खात्री असल्याचे ते बोलले. यावेळी आम्ही काही तगडे उमेदवार उभे केले असल्याचे ही ते म्हणाले.
ते म्हणाले की राज्यात विधानसभेच्या 60 जागा असून आमचे 29 विद्यमान आमदार आहेत. तर त्यांची लोकांमध्ये असलेली पकड पाहता या निवडणुकीत त्यांना अधिक संधी असल्याचे म्हणता येईल. ते म्हणाले की सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला फक्त काही जागांची गरज आहे, जी मिळवणे तितके कठीण नाही.