सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. उत्तराखंड विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (15:55 IST)

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण

voting machine
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झाली असून यंदा राज्यात 81 लाख 72 हजार 173 मतदार मतदान करणार आहे. ही माहिती उत्तराखंडच्या मुख्य निवडणूक अधिकारी सौजन्य जावळकर यांनी दिली आहे. राज्यात 40 लाख 32 हजार 995 महिला मतदार आहेत.
 
मुख्य निवडणूक अधिकारी सौजन्य यांच्याप्रमाणे राज्यात 81 लाख 72 हजार 173 मतदार आहे. त्यापैकी 42 लाख 38 हजार 890 पुरुष मतदार आहेत तर 39 लाख 32 हजार 995 महिला मतदार आहेत. राज्यात 94 हजार 471 सेवा मतदार आहेत. राज्यातील निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण झाली असून यावेळी आयोगाने संपूर्ण राज्यात 11 हजार 697 मतदान केंद्रे उभारली आहेत. 156 मॉडेल बूथ तयार करण्यात आले आहेत. तसेच राज्यातील 101 मतदान केंद्रांना सखी बूथ असे नाव देण्यात आले आहे जेथे  महिला मतदान अधिकारी कर्मचारी असतील.
 
हरिद्वारच्या खानपूर विधानसभेच्या नागला इमरती मतदान केंद्रावर 1248 मतदार आहेत. हे सर्वाधिक मतदार आहेत. तर जसपूरच्या गढी नेगी मतदान केंद्रावर 1248 मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदार कोटद्वार विधानसभेच्या ढिकाला मतदान केंद्रावर आहे. या मतदान केंद्रावर केवळ 14 मतदार आहेत.