बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By Author रूपाली बर्वे|
Last Modified: शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (09:26 IST)

हवा एक जिवलगा...

माणूस धडपडतो
करतो खटपट
पोटाची आग शांत व्हावी म्हणून
 
माणूस धडपडतो
करतो खटपट
पोटाची आग शांत व्हावी म्हणून
ती तरी होईलच कशीबशी
तरी मन थांबतंय कुठे यावरून...
 
ती तरी होईलच कशीबशी
तरी मन थांबतंय कुठे यावरून
ते फरकटतय भौतिक सुखांमध्ये
एकापेक्षा एक महाग वस्तूंनी घर भरण्यामध्ये
 
या धावपळीत मात्र
काही तरी मागे सुटतंय
आता कळत नसलं तरी
काही तरी हातातून निसटतंय
 
स्वत:ला शांतपणे प्रश्न विचारा
आपण जगतोय कसे 
सर्व आहे जीवाशी
पण चुकतंय कुठे??
 
तर तुम्ही म्हणाल...
यालाच तर जगणं म्हणतात
भरलेलं पोट आणि
घरात भरभरून सुख
मग कशाला शोधून काढताय उगाचच दुःख
 
शोधतं नाहीये दुःख
खरंच शोधतं नाहीये दुःख
खरं तर दुःख सांगायला नाहीये माणूस
दुःख सांगायला मिळत नाहीये माणूस
कारण कुणालाही ऐकाव्याश्या वाटत नाही दुसर्‍यांच्या कळा
केवळ माणूस नव्हे यासाठी
केवळ माणूस नव्हे यासाठी
हवा एक जिवलगा...