सायंकाळी रानांत चुकलेलें कोकरुं (सावरकरांची कविता)

savarkar kavita
Last Modified मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (16:48 IST)
चाल- नृपममता रामावरती सारखी
कां भटकसि येथें बोलें। कां नेत्र जाहेले ओले
कोणि कां तुला दुखवीलें। सांग रे
धनि तुझा क्रूर की भारी । का माता रागें भरली
का तुझ्यापासुनी चुकली । सांग रे
हा हाय कोंकरुं बचडें। किति बें बें करुन अरडे
उचलोनि घेतलें कडे। गोजिरें
कां तडफड आतां करिसी। मीं कडें घेतलें तुजसी
चल गृहीं चैन मन खाशी। ऐक रे
मी क्रूर तुला का वाटे। हृदय हें म्हणुनि का फाटे
भय नको तुला हें खोटें। ऐक रे
हा चंद्र रम्य जरि आाहे। मध्ययान रात्रिमधिं पाहे
वृक वारुनि रक्षिल ना हें। जाण रे
तों दूर दिसतसे कोण। टपतसे क्रूर बघ यवन
गोजिरी कापण्या मान। जाण रे
कमि कांहिं न तुजलागोनी। मी तुला दुध पाजोनी
ही रात्र गृहीं ठेवोनी। पुढति रे
उदईक येथ तव माता। आणीक कळपिं तव पाता
देईन तयांचे हातां। तुजसि रे
मग थोपटुनी म्यां हातें। आणिलें गृहातें त्यातें
तो नवल मंडळींनातें। जाहलें
कुरवाळिति कोणी त्यातें। आणि घेति चुंबना कुणि ते
कुणि अरसिक मजला हंसते। जाहले
गोजिरें कोंकरुं काळें। नउ दहा दिनांचे सगळें
मउम केश ते कुरळे। शोभले
लाडक्या कां असा भीसी। मी तत्पर तव सेवेसी
कोवळी मेथि ना खासी। कां बरें
बघ येथें तुझियासाठीं। आणिली दुधाची वाटी
परि थेंब असा ना चाटी। कां बरें
तव माता क्षणभर चुकली। म्हणुनि का तनू तव सुकली
माझीही माता नेली। यमकरें
भेटेल उद्यां तव तुजला। मिळणार न परि मम मजला
कल्पांतकाल जरि आला। हाय रे
मिथ्या हा सर्व पसारा। हा व्याप नश्चरचि सारा
ममताही करिते मारा। वरति रे
ह्या जगीं दु:खमय सारें। हीं बांधव पत्नी पोरें
म्हणुनियां शांतमन हो रे। तूं त्वरें
तरि कांहिं न जेव्हां खाई। धरुनियां उग्रता काहीं
उचटिलें तोंड मीं पाही। चिमुकलें
हळु दूध थोडके प्यालें। मग त्वरें तोंड फिरवीलें
कोंकरुं बावरुन गेले। साजिरें
स्वातंत्र्य जयांचे गेलें। परक्यांचे बंदी झाले
त्रिभुवनीं सुख न त्यां कसलें। की खरें
लटकून छातिशीं निजलें। तासही भराभर गेले
विश्व हें मुदित मग केलें। रविकरें
घेउनी परत त्या हातीं। कुरवाळित वरचेवरतीं
कालच्या ठिकाणावरती। सोडिलें
तों माता त्याची होती। शोधीत दूर शिशुसाठीं
दगडांचे तरुंचे पाठीं। हाय रे
हंबरडे ऐकं आले। आनंदुसिंधु ऊसळले
स्तनी शरासारखें घुसलें। किति त्वरें
डोलतो मुदित तरुवर तो। सप्रेम पक्षि हा गातो
तोकडा प्रतिध्वनि देतो। मुदभरें
हे प्रभो हर्षविसि यासी। परि मला रडत बसवीसी
मम माता कां लपवींसी। अजुनि रे


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

आपल्या पायांवर सूज येते? मग हे कारणं असू शकतं

आपल्या पायांवर सूज येते? मग हे कारणं असू शकतं
आजकाळ पायांवर सूज येणे ही एक मोठी समस्या बनली आहे. यामागील कारणे काय आहे? या बद्दलची ...

केस आणि चेहर्‍याच्या सौंदर्यासाठी सोयाबीन, बहुमूल्य फायदे ...

केस आणि चेहर्‍याच्या सौंदर्यासाठी सोयाबीन, बहुमूल्य फायदे जाणून घेऊया
सोयाबीनमध्ये प्रथिनं असतात म्हणून त्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण सोयाबीनचे ...

काळी मुद्रा: याने म्हातारपण पळवा आणि पचन दुरुस्त करा

काळी मुद्रा: याने म्हातारपण पळवा आणि पचन दुरुस्त करा
योगामध्ये बऱ्याच प्रकाराचे शारीरिक मुद्रा आणि हस्त मुद्रांचा उल्लेख मिळतो. मुद्रांचे ...

Hydroxychloroquine मुळे हृदयाच्या ठोक्यांवर पडू शकतो प्रभाव

Hydroxychloroquine मुळे हृदयाच्या ठोक्यांवर पडू शकतो प्रभाव
ह्युस्टन- संशोधकांनी ऑप्टिकल मॅपिंग सिस्टमचा वापर हे दर्शविण्यासाठी केले आहे की कश्या ...

Orange Face pack : संत्र्याच्या सालीपासून मिळवा तजेल त्वचा

Orange Face pack : संत्र्याच्या सालीपासून मिळवा तजेल त्वचा
संत्री खाण्यात जेवढे चविष्ट लागतात तितकेच हे गुणवर्धक आणि आरोग्य आणि सौंदर्य ...