रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (15:51 IST)

आज म्हणे आहे प्रपोज डे

आज म्हणे आहे प्रपोज डे,
मला समजत नाहीय कसं करू गडे?
केलंच आपण प्रपोज त्याला अचानक,
आवडेल की नाही त्यास हा प्रश्न एक!
मनातली भावना मनात राहून जाईल असं वाटतं,
करून बघू का हिय्या, असं ही वाटून जातं,
आलीच आहे संधी तर, वापरून तिज बघते,
संधीच सोनं करत मनातलं त्यास आज सांगते!!
अश्विनी थत्ते.