वेलेन्टाईन डे विशेष : व्हेलेंटाईन आठवड्याची यादी  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  1 रोज डे - या दिवशी आपण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी लाल, पिवळे, गुलाबी  गुलाब देऊ शकता. फुल हे सर्वात गोड आणि आवडीची वस्तू आहे. त्यापैकी गुलाब त्यात एक आहे. म्हणून हा दिवस रोमँटिक संदेशांसह गुलाबाच्या देवाण-घेवाण साठी आहे.  
				  													
						
																							
									  
	 
	2 प्रपोज डे -  हा दिवस प्रपोज करण्याचा आहे. या दिवशी लोक आपल्या प्रिय व्यक्तीला कायम च्या नाते संबंधांचा प्रस्ताव देतात. हा वेलेन्टाइन आठवड्याचा दुसरा दिवस आहे. 
				  				  
	 
	3 चॉकलेट डे- हा दिवस प्रत्येकाला आवडतो, हा दिवस चॉकलेट दिवस म्हणून साजरा करतात.हा वेलेन्टाइन आठवड्याचा तिसरा दिवस आहे.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	4 टेडी डे- मुलींना टेडी खूप आवडतात. म्हणून त्यांचे प्रियकर त्यांना ह्या दिवशी टेडी देतात.हा वेलेन्टाइन आठवड्याचा चवथा दिवस आहे.
				  																								
											
									  
	 
	5 प्रॉमिस डे -हा दिवस आपल्या प्रियजनांना अर्थपूर्ण आश्वासन देण्यासाठी करतात. काही आश्वासने देऊन आपण आपले नातं कायमस्वरूपी घट्ट करू शकता.हा वेलेन्टाइन आठवड्याचा पाचवा दिवस आहे. 
				  																	
									  
	 
	6 ह्ग डे - या दिवशी  प्रेमाची अभिव्यक्ती आपल्या प्रियजनांना मिठी देऊन साजरा करतात. मिठी दिल्यानं समोरचा सर्व समस्या विसरेल. या साठी त्यांना एक प्रेमाची मिठी द्या आणि हे दर्शवा की आपले त्यांच्या वर खूप प्रेम आहे.हा वेलेन्टाइन आठवड्याचा सहावा दिवस आहे. 
				  																	
									  
	 
	7 किस डे- किस डे या वेलेन्टाइन आठवड्याचा सहावा दिवस आहे. हा दिवस अनेक जोडप्यांना आवडीचा दिवस आहे. या दिवशी जोडपे एक मेकांचा चुंबन घेतात. हा वेलेन्टाइन आठवड्याचा सातवा दिवस आहे.
				  																	
									  
	 
	8 वेलेन्टाइन डे- हा तो दिवस आहे जेव्हा आपण आपल्या जोडीदाराची निवड करता. किंवा एखाद्याला आपल्या प्रेमाची कबुली देता आणि त्याला आपल्या जीवनात चांगल्या जोडीदार म्हणून बनविण्याची इच्छा बाळगता. हा दिवस नवीन प्रेम साजरा करण्यासाठी चा दिवस आहे. तसेच वैवाहिक नवसाना नवीन करण्याचा दिवस आहे.  
				  																	
									  
	 हा वेलेन्टाइन आठवड्याचा आठवा आणि सर्वात महत्वपूर्ण दिवस आहे.