व्हॅलेंटाइन डे की बात ही कुछ और है..!
प्रेम ही एक अशी भावना जी व्यक्त होताच चेहरा खुलतो, बहर येतो. तसं बघितलं तर प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी कुठल्याही ठरावीक वेळेची, डेची, जागेची गरज नसते. 365 दिवस हे प्रेमाचेच असतात... पण व्हॅलेंटाइन डे की बात ही कुछ और है..!
7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरूवात झाली आहे. दैनंदिन जीवनात व्हॅलेंटाइनबाबत असलेल्या आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला संधी मिळत नाही, त्यामुळे व्हॅलेंटाइन वीकच्या निमित्ताने ती संधी निर्माण केली जाते. प्रेमाच्या या दिवसाने तरुणाईला वेड लावलं, असंही म्हटलस वावगं ठरणार नाही. अगदी ठरवून या दिवशी कुणी प्रेमात पडत नाही, मात्र तरीही वर्षभर याची तयारी सुरू असते.
*संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस
रोम राज्यातून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. प्रमेची अभिव्क्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोममध्ये केलेडिस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्र आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईम स आहे, असं मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्यांचाही त्याला राग यायचा. संत व्हॅलेंटाइनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला. केलेडिसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाइनला तुरुंगात डांबलं. तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाइनचा जीव जेलरच्या मुलीवर पडला. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली होती. फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट युअर व्हॅलेंटाइन असा केला. तेव्हापासूनच 14 फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, अशी आख्यायिका आहे.
*प्रेमाच्या दिवसाची प्रथा पूर्वीपासून
प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी एक विशिष्ट असा दिवस असण्याची प्रथा फार पूर्वीपासून होती. रोमन फेस्टिवलमधून याची खरी सुरुवात झाली. रोमनमध्ये फेब्रुवारीमध्ये ल्युपर्सिया नावाचा सण साजरा केला जातो. म्हणजेच वसंत ऋतूची सुरुवात. सेलिब्रेशनचा भाग म्हणून, मुलं मुलींच्या नावाची चिठ्ठी एका बॉक्समधून काढतात. त्यानंतर या फेस्टिवलदरम्यान, ते दोघं गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असतात, आणि नंतर त्यांना वाटलं तर ते एकमेकांशी लग्र देखील करू शकतात. त्यानंतर चर्चने हा फेस्टिवल संत व्हॅलेंटाइन यांच्या स्मृतीत ख्रिश्चन धर्मात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला. पण कालांतराने, संत व्हॅलेंटाइनच्या नावाने लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तींजवळ आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली.
राहुल वंजार