शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. आषाढी एकादशी 2024
Written By
Last Updated : बुधवार, 17 जुलै 2024 (08:05 IST)

Ashadhi Ekadashi 2024 आषाढी एकादशी उपवास संबंधी माहिती

आषाढी एकादशी चे महत्व काय?
आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी तसेच भाविक पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहचतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.
 
आपण एकादशीला उपवास का करतो?
हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाचा मुख्य उद्देश मनावर आणि शारीरिक इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे आहे. आणि नियंत्रणाद्वारे त्याला आध्यात्मिक प्रगतीकडे वळवणे असे आहे. याव्यतिरिक्त व्रत संबंधित अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत हा वर्ज्य कालावधी मानला जातो. एकादशीला चुकूनही भात खात नाही.
 
आषाढी एकादशीचे व्रत कधी सोडावे?
भाविक एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस आणि ती रात्र व्रत करतात. व्रत करणार्‍यांनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर उपवास सोडावा. द्वादशी तिथीच्या आत व्रताचे पारणं केले पाहिजे.
 
एकादशी व्रत कसे करावे? काय खावे काय नाही नियम जाणून घ्या
एकादशीला अशुद्ध द्रव्ययुक्त पेयपदार्थांचे सेवन करणे टाळावे. जसे की कोल्ड ड्रिंक्स, पॅक्ड फ्रूट ज्यूस, आइसक्रीम. 
या दिवशी तळलेले पदार्थ खाऊ नयेत. 
उपवास न करणार्‍यांनी देखील या दिवशी दोनदा जेवण करू नये. तसेच टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, ब्रोकोली, बेलमिरी, मटार, चणे, सर्व प्रकारचे बीन्स किंवा बीन्सपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे.
फळे, फळांचा फ्रेश ज्यूस, दूध किंवा पाणी यावर राहणे अधिक योग्य. 
आंबे, द्राक्षे, केळी, बदाम, पिस्ते काजू इतर सेवन करता येतं.
या दरम्यान दशमी, एकादशी आणि द्वादशीला काशाच्या भांड्यात जेवण करू नये. 
मांस, कांदा- लसूण, पालेभाज्या, मसूर डाळ, नाचणी, उडीद डाळ, चणे, मध, तेल पदार्थांचे सेवन करू नये.
एकादशी व्रताच्या पहिल्या दिवशी म्हणजे दशमीला व एकादशीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे द्वादशीला हविष्यान्न जसे जव, गहू, मूग, सैंधव मीठ, मिरे, साखर, गायीचे तूप इतर पदार्थांचे केवळ एकदा सेवन करावे. 
फलाहारीने कोबी, गाजर, नवलकोल, घोळ, पालक इतर भाज्यांचे सेवन करू नये.