बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. आषाढी एकादशी 2024
Written By
Last Updated : बुधवार, 17 जुलै 2024 (08:05 IST)

आषाढी एकादशीच्या उपवासात काय खावे?

fasting
आषाढी एकादशीच्या दिवशी भाविका मनोभावे व्रत ठेवतात. या दिवशी व्रत आहारात सुका मेवा, फळे आणि दुग्धजन्य पदार्थांना परवानगी आहे. तसेच सोयाबीन, वाटाणे, कडधान्ये आणि धान्ये खाण्यास मनाई आहे. या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत किंवा खाऊ नयेत असे सांगितले जाते. दुसऱ्या दिवशी गरजूंना अन्नदान करून उपवास संपवावा. 
 
या पवित्र दिवशी जे भाविक व्रत करत नसतील तरी त्यांना हरभरे आणि मसूर, मध, विशिष्ट मसाले आणि मांस यांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. लसूण आणि कांदा यांसारख्या मुळांपासून बनवलेले तामसिक अन्नही घेऊ नये. ते दुसऱ्या दिवशी सकाळी दूध, मध, साखर आणि मैदा अर्पण करू शकतात. हा दिवस चातुर्मासाची सुरुवात करतो, जे हिंदू कॅलेंडरमध्ये पवित्र चार महिने आहेत आणि या काळात शुभ कार्ये केली जात नाहीत.
 
एकादशीला भात का खात नाही?
पद्यपुराणानुसार एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अवतारांची पूजा केली जाते. या दिवशी मनोभावे पुजा केल्यास मोक्षप्राप्ती होते. तसेच यहजारो यज्ञ केल्याने जितके पुण्य मिळते तितके पुण्य या दिवशी दान केल्याने मिळते. आपण आधीपासून ऐकत आलोय की एकादशीच्या दिवशी तांदळाचे तसेच त्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केले जात नाही. मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे का?...
 
शास्त्रात तांदळाचा संबंध जलाशी लावण्यात आला आहे आणि जलाचा संबंध चंद्राशी. पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये यांच्यावर मनाचा अधिकार असतो. मन आणि सफेद रंगाचा स्वामी चंद्र आहे. 
 
एकादशीच्या दिवशी शरीरात जलाची मात्रा जितकी कमी असले तितके व्रत सात्विक मानले जाते. तांदळात पाण्याची मात्रा अधिक असते. जलावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे भात खाल्ल्याने शरीरात पाण्याची मात्रा वाढते. यामुळे मन अधिक विचलित अथवा चंचल होते. यामुळे व्रतामध्ये अडथळे येण्याची भिती असते. एकादशीचे व्रत करताना मन निग्रही असणे आणि सात्विक भाव असणे गरजेचे असते. म्हणून एकादशीच्या दिवशी भात खात नाहीत.