बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. आषाढी एकादशी 2024
Written By

आषाढी एकादशीच्या दिवशी या प्रकारे करा तुळस सेवा, देवी लक्ष्मीचे आगमन होईल

tulsi vivah decoration
Devshayani ekadashi upay: आषाढी एकादशी 17 जुलै 2024 रोजी आहे. याला देवशयनी ग्यारस किंवा हरिशयनी आणि पद्मा एकादशी असे देखील म्हणतात. या दिवशी विष्णू प्रभू 4 महिन्यासाठी योगनिद्रामध्ये जातात. एकादशीचा दिवस हा श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच तुळशी मातेच्या पूजेचा दिवस आहे. या दिवशी तुळशी माता व्रत देखील केले जाते.
 
1. तुपाचा दिवा अर्पण करा: तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावा. यामुळे तुळशी माता प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल आणि त्यांच्या आशीर्वादाने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल.
2. उसाचा रस : तुळशीच्या रोपावर उसाचा रस अर्पण करणे देखील शुभ मानले जाते.
3. कच्चं दूध : गुरूवार आणि शुक्रवारी गाईचे कच्चं दूध तुळशीला अर्पण करणे देखील शुभ असते.
4. सावष्णीचे साहित्य: तुळशीला सवष्णीचे साहित्य देखील अर्पण केले जाते. त्यांना चुनरीने झाकून हळद, कंकू आणि गंध अर्पण करावे.
5. तांब्याचे पाणी: जेव्हा तुम्ही तुळशीला जल अर्पण करता तेव्हा ते पाणी काही तास तांब्याच्या भांड्यात ठेवा. त्यात थोडी हळद मिसळून ते पाणी अर्पण करावे. झाडावर कच्चे दूध किंवा उसाचा रस लागल्यास पाणी अर्पण करुन काढून टाकावे.
 
नियम : रविवारी आणि एकादशीला तुळशीला काहीही अर्पण करू नये. तुम्ही फक्त दिवे दान करू शकता कारण माता तुळशी या दिवशी व्रत ठेवते. खरमासाच्या दिवसात तुम्ही पाणी देऊ शकता पण इतर कोणत्याही प्रकारची वस्तू देऊ नका. जर तुम्हाला लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद मिळवायचा असेल आणि तुमच्या घरात धन-समृद्धी वाढवण्याचा विचार करत असाल, तर तुळशीच्या रोपाची चांगली काळजी घ्या आणि रोज तिची पूजा करा. पूजा करताना किंवा काहीही अर्पण करताना 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' या मंत्राचा जप करावा.