Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ashadhi Ekadashi 2025 Wishes in Marathi आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Published: रविवार, 6 जुलै 2025 (09:00 IST)
नाम तुझे ओठी
पाऊले चालती
वाट हरीची…
नाद पंढरीचा
साऱ्या जगा मधी…
चला जाऊ पंढरी
आज आषाढी एकादशी…
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
 
तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
ताल वाजे, मुदूंग वाजे, वाजे हरिची वीणा, 
माऊली निघाली पंढपपुरी 
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
 
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती
नये माझ्या चित्ती नामा म्हणे
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
 
आनंदी आनंद भरला
अवघा दाही दिशां कोंदला
संत सज्जनांचा मेळा
भक्तीरंगाने रंगला
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
विठ्ठल नामाचा गजर
पंढरी वैकुंठ भूवर
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा
 
विठ्ठल माझा ध्यास, 
विठ्ठल माझा श्वास, 
विठ्ठल माझा भास, 
विठ्ठल माझा आभास… 
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
चला पंढरीसी जाऊ, 
रखमादेवीवरा पाहू, 
डोळे निवतील कान, 
मना तेथेचि समाधान… 
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
अखंड जया तुझी प्रीती, 
मज दे तयाची संगती…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
विठोबासी शरण जावे, 
निजनिष्ठे नाम गावे…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
आता कोठें धावे मन, 
तुझे चरण देखलिया, 
भाग गेला शीण गेला, 
अवघा झाला आनंद…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
घेई घेई माझे वाचे, 
गोड नाम विठोबाचे, 
तुम्ही घ्यारे डोळे सुख, 
पाहा विठोबाचे मुख…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
यई वो विठ्ठले भक्तजन वत्सले… 
करूणा कल्लोळे पाडुंरंगे…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
लक्ष्मी वल्लभा… 
दीनानाथा पद्मनाभा… 
सुख वसे तुझे पायीं, 
मज ठेवी तेचि पायी…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
हित ते करावे देवाचे चिंतन, 
करूनिया मन शुद्ध भावे…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
आवडे हे रूप गोजिरे सगुण, 
पाहतां लोचन सुखावले…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
ALSO READ: आषाढी एकादशी उपवास कसा करावा
ऐसी चंद्रभागा, 
ऐसा भीमातीर, 
ऐसा विटेवर देव कोठे…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, 
आणिकाचे काम नाही येथे…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
गुणा आला ईटेवरी, 
पीतांबरधारी सुंदर तो,
डोळे कानन त्याच्या ठायीं, 
मन पायीं राहो हें…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
विठ्ठल आवडी प्रेमभावो, 
विठ्ठल नामाचा रे टाहो…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व पहा

एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची आराधना आणि नामस्मरणामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती लाभते

श्रावण महिन्यात महिलांनी कोणते नियम पाळावेत?

गटारी अमावस्येला मांसाहार करण्याची परंपरा का? जाणून घ्या या दिवसामागचं खास कारण

श्रावण शुक्रवार जिवती पूजन २०२६: पूजा साहित्य, विधी, नैवेद्य, आरती आणि कथा (संपूर्ण माहिती)

श्रावण सोमवारची पूजा कशी करावी? संपूर्ण आणि सोपी विधी

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments