सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By

आषाढी एकादशी 2023 : पालखीचं वेळापत्रक जाणून घ्या एका क्लिकवर

2023 साली होणाऱ्या पंढरपूरच्या वारीचं वेळापत्रक आलं आहे. यावर्षी वारी 11 जून ते 29 जून या काळात होणार आहे.
 
हे वेळापत्रक पुढील छायाचित्रांच्या माध्यमातून पाहू या.
 
12 जूनला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची सुरुवात आळंदी येथून होणार आहे.
 
पुण्यात वारी 12 आणि 13 जूनला असणार आहेत. त्यांचा परतीचा प्रवास पंढरपूरहून 3 जुलैला असणार आहे.
 
तुकाराम महाराजांच्या पालखीची सुरुवात 10 जूनपासून सुरू होणार आहे.
 
3 जुलैपर्यंत हा पालखी सोहळा सुरू राहणार असून 3 जुलैपर्यंत पालखी पंढरपूरला राहणार आहे.
 
कोरोना काळात पालख्या स्थगित झाल्या होत्या. तेव्हापासून पालखी सुरू झाल्याचं हे दुसरं वर्षं आहे. 29 जूनला आषाढी एकादशी आहे.