शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By

श्री गजानन महाराज पालखी सोहळा

आषाढी एकादशीनिमत्तिाने शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे परभणी जिल्ह्यात आगमन झाले आहेत. आता पुढील चार दिवस पालखीचे मुक्काम परभणी जिल्ह्यातील विविध भागात असणार आहे. येथे जागोजागी भाविकांनी श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे मोठ्या श्रद्धेने स्वागत केले.
 
हे वारीचे 51 वे वर्ष असून संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीत सुमारे 750 वारकरी सहभागी झाले आहे. येथून 55 किमीचा प्रवास करत वारकरी पंढरपूरला पोहचणार आहे. अशात या चार दिवसात परभणीत भक्तिमय वातावरण दर्शन लाभ घेण्यासाठी भाविकांचा उत्साह बघण्यासारखा आहे.