सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Updated : शनिवार, 9 जुलै 2022 (13:43 IST)

Vitthal Abhang यारे नाचू प्रेमानांदे

vitthal abhang marathi
यारे नाचू प्रेमानांदे,
विठ्ठल नामाचिया छंद || धृ ||
यारे नाचू प्रेमानांदे….
 
जाऊ म्हणती पंढरीची वाटे,
कळीकाळा भयं वाटे || १ ||
यारे नाचू प्रेमानांदे….
 
चंद्रभागे घडले स्नान,
याम लोकी पडली हान || २ ||
यारे नाचू प्रेमानांदे….
 
झाली पुंडलिक भेटी,
पूर्वज आनंदले वैकुंठी || ३ ||
यारे नाचू प्रेमानांदे….
 
आता राऊळासी जाता,
झाली जीवाची मुक्तता || ४ ||
यारे नाचू प्रेमानांदे….
 
विष्णुदास नामा म्हणे,
आता नाही येणे जाणे || ५ ||
यारे नाचू प्रेमानांदे….