1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. मतदाता शिक्षा एवं जागरूकता
  4. Voter Awareness How to Apply for Voter ID Card

Voter Awareness:मतदान ओळखपत्र करिता अर्ज कसा करावा?

Voter Awareness : भारतात मतदान ओळखपत्र मिळण्याकरिता नागरिकांनी खालील प्रक्रियाचे पालन करणे आवश्यक आहे. 
1. आधिकारिक मतदाता सेवा पोर्टल वेबसाइटला भेट द्या.
2. वेबसाइट वर 'फॉर्म' विभाग शोधा आणि योग्य फॉर्म निवडा : भारतच्या नागरिकांसाठी  'फॉर्म 6' किंवा एनआरआईसाठी  'फॉर्म 6ए', फॉर्मची प्रिंट आउट घ्यावी.  
3. जर ऑनलाइन अर्ज करत असाल तर, आपला मोबाइल नंबर, ईमेल आईडी आणि अन्य आवश्यक तपशील प्रदान करून नोंदणी करावी. जर पहिल्यापासूनच नोंदणी आहे, तर आपला मोबाइल नंबर किंवा ईपीआईसी नंबर आणि पासवर्डचा उपयोग करून लॉग इन करावे. 
4. फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करावे. 
5. “सबमिट” बटन वर क्लिक करावे. 
6. तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत मतदाता ओळख पत्रासाठी पृष्ठ लिंकसोबत एक ईमेल मिळेल. इथे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकतात. तुमचे मतदान कार्ड एक महिन्याच्या आत येईल. 
 
मतदान फक्त एक अधिकार नाही तर एक जवाबदारी ही आहे. जी  प्रत्येक नागरिकाने अंगीकृत करायला हवी . मतदान करून तुम्ही तुमचे मत व्यक्त करू शकतात. देशाच्या भविष्य घडवू शकता.  आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींना जबाबदार धरू शकता. निवडणूक प्रक्रियेमध्ये कर्तव्यदक्ष भागीदारी लोकतंत्राला टिकवून ठेवणे तसेच समवेशी शासनला चालना देणे आणि एक समृद्ध आणि समजूतदार समाजमध्ये योगदान देण्यासाठी मदत करते.
पुढील लेख
Voter Awareness: भारतात मतदान कोण करू शकते? कोण करू शकत नाही?