शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. चंद्रावर पाणी
Written By वेबदुनिया|

असे उलगडले गुढ

PR
चांद्रयानासोबत नासाने पाठविलेल्‍या खनिज संशोधक उपकरणाद्वारे घेण्‍यात आलेली चंद्राची प्रतिमा. या प्रतिमेवरून चंद्रावर पाणी असण्‍याची शक्यता वाटल्‍याने येथे अधिक शोध घेण्‍याचा प्रयत्‍न केला गेला. आणि चंद्रावर वातावरण आणि पाण्‍याच्‍या शोधास अखेर भारताच्‍या प्रयत्‍नांनी दिशा मिळाली. इस्‍त्रोने राब‍वलेल्‍या चांद्रयान-1 अभियानातून चंद्रावर पाणी असल्‍याचे पुरावे आढळून आले आहेत.

PR
चंद्रावर प्रकाशाचा होणारा बारीक-सारीक परीणाम या नकाशात टीपण्‍यात आला आहे. स्‍पेक्ट्रा नावाने ओळखल्‍या जाणा-या माहितीच्‍या आधारे चंद्रावरील खनिजे आणि मातीचा अभ्‍यास करणे शक्य होणार आहे. डाव्‍या बाजूला चंद्राच्‍या खडकाच्‍या विघटनाचे करण्‍यात आलेले स्‍पष्‍टीकरण. हायड्रोजन मोलॅक्युलस आणि पाण्‍याच्‍या अंशामुळे येथे दाखविण्‍यात आलेली निळी रेषा.

PR
इस्‍त्रोने पाठविलेल्‍या चांद्रयानात नासाचे एम-3 हे उपकरण बसविले होते. या उपकरणाच्‍या साह्याने चंद्रातील अनेक गुढ रहस्ये उकलण्‍याचा प्रयत्न केला जाणार होता. या उपकरणानुसार चंद्र हा अनेक प्रकारच्‍या खडक आणि मातीमुळे बनला असून या खनिजांमध्‍ये असलेल्‍या वेगवेगळ्या वैशिष्‍ट्यांमुळे त्‍यातून वेगवेगळ्या रंगछटांचे वरावर्तन होत असते. या खनिजांतील गुणधर्मावर हा रंग अवलंबून असून त्‍याचा अभ्‍यास करण्‍यासाठी एम-3 या उपकरणात विशेष स्‍पेक्ट्रोमीटर बसविण्‍यात आले होते.
PR
नासाने 19 ऑगस्‍ट 1999 मध्‍ये केलेल्‍या संशोधनातून चंद्रावर पाणी असल्‍याची शक्यता बळावली होती. त्‍या आधारे केलेल्‍या संशोधनानंतर चंद्राच्‍या पृष्ठभागावर हायड्रोक्सि1 असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले.
PR
नासाच्‍या एम-3 या उपकरणाच्‍या साह्याने घेण्‍यात आलेले चंद्राचे सर्वांत ताजे छायाचित्र. हायड्रोक्सि 1 मटेरियल आणि चंद्राच्‍या खनिजांमुळे निर्माण झालेल्‍या नीलरंगामुळे येथे पाण्‍याचे अस्तित्‍व अधोरेखित झाले आहे.