गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. फ्लॅशबॅक 2022
Written By

Celebrity deaths in 2022 लता दीदींपासून ते राजू श्रीवास्तव यांनी जगाचा निरोप घेतला

Celebrity deaths in 2022 वर्ष 2022 हे बॉलिवूडसाठी दुखदायी ठरलं. या वर्षी भारताची स्वर कोकिळा लता मंगेशकर आणि पंडित बिरजू महाराज यांसारख्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. संगीताचे सेवक आणि सुमधुर संगीताने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या कलाकाराने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. तर दुसरीकडे हसून हसून लोटपोट करणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला. बॉलीवूडचे असे अनेक स्टार्स या वर्षी आपल्या सर्वांपासून कायमचे दूर गेले.
 
लता मंगेशकर
‘क्वीन ऑफ मेलोडी' आणि ‘नाइटिंगेल ऑफ इंडिया' या नावाने प्रसिद्ध लता मंगेशकर यांचे 6 फेब्रवारी 2022 रोजी वयाच्या 92 वर्षी मल्टीपल ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम मुळे निधन झाले. ही भारतीय चित्रपटसृष्टीची कधीही भरून न येणारी हानी आहे.
बप्पी लहिरी
बप्पी अपरेश लाहिरी ज्यांना बप्पी दा म्हणून ओळखले जाते ते सर्वात प्रसिद्ध गायक आणि संगीतकार होते. 15 फेब्रुवारी 2022 रोजी बप्पी दा यांचे मुंबईत ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामुळे निधन झाले. संगीतासोबतच बप्पी दा यांनी राजकारणातही हात आजमावला होता.
राजू श्रीवास्तव
सर्वांना हसवणारे प्रसिद्ध कॉमेडियन सत्य प्रकाश श्रीवास्तव म्हणजेच राजू श्रीवास्तव जाताना सर्वांचे डोळे मात्र अश्रुंनी जड करुन गेले. जिममध्ये वर्कआउट करताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला आणि अनेक दिवस आयुष्याशी झुंज दिल्यानंतर अखेर 21 सप्टेंबर 2022 रोजी त्यांचे निधन झाले.
पंडित बिरजू महाराज
कथ्थक नर्तक, संगीतकार आणि गायक पंडित बिरजू महाराज यांचे या वर्षी जानेवारीत निधन झाले. 16 जानेवारी 2022 रोजी त्यांच्या 85 व्या वाढदिवसाच्या अगदी एक महिना आधी त्यांचे दिल्लीतील घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
के.के
केके या नावाने प्रसिद्ध सिंगर कृष्णकुमार कुन्नत आपल्या सुंदर आवाजासाठी प्रसिद्ध होते. हिंदीसोबतच तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेत गाणारे केके यांचे एक लाइव्ह संगीत कार्यक्रमदरम्यान निधन झाले. परफॉर्मेंस देताना त्यांना अस्वस्थ वाटत होते आणि नंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
सिद्धू मूसे वाला
शुभदीप सिंह सिद्धू, ज्यांना सिद्धू मूसेवाला या नावाने ओळखले जाते ते संगीतकार, रॅपर, गीतकार आणि अभिनेता देखील होते. 29 मे 2022 रोजी मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात अज्ञात हल्लेखोरांनी मूसेवाला यांच्या कारवर हल्ला केला ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
संध्या मुखर्जी
गीताश्री संध्या मुखर्जी भारतातील बंगाली पार्श्वगायिका आणि गिटार वादक होती. 1970 मध्ये त्यांना जय जयंती आणि निशी पद्मा या चित्रपटांमधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संध्या मुखर्जी यांना 27 जानेवारी रोजी श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि सायंकाळी 7.30 वाजता त्यांचे निधन झाले.
पंडित शिवकुमार शर्मा
पंडित शिवकुमार शर्मा संतूर वादक आणि भारतीय शास्त्रीय संगीतकार होते. शर्मा यांचे 10 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते 84 वर्षांचे होते. त्यांना काही महिन्यांपासून किडनी निकामी झाल्यामुळे ते नियमित डायलिसिसवर होते.
सायरस मिस्त्री
सायरस मिस्त्री 2012 ते 2016 या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष होते. ते या गटाचे सहावे अध्यक्ष होते. अहमदाबाद-मुंबई महामार्गावर 4 सप्टेंबर 2022 रोजी कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
प्रवीण कुमार
बीआर चोप्रा निर्मित लोकप्रिय मालिका 'महाभारत' मध्ये भीम ही भूमिका साकारणाऱ्या प्रवीण सोबती यांचे 7 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते.