रविवार, 13 एप्रिल 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 8 एप्रिल 2025 (21:30 IST)

योगा करण्यापूर्वी हे नियम लक्षात ठेवा

आजच्या धावत्या जीवनशैलीत खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तारुण्यातच बीपी, मधुमेह, ह्रदयविकाराच्या त्रास सातत्याने वाढत आहे. योगासनांच्या नियमित सरावामुळे तुम्ही या जीवघेण्या आजारापासून लांब राहू शकता. आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योगासन करणे आवश्यक आहे. योगासन करण्यापूर्वी काही नियमांना लक्षात ठेवा.जेणे करून कोणत्याही प्रकारची समस्या उदभवणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या.
आजच्या काळात, स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, लोक जिममध्ये जाण्यासोबतच योगा करायला लागले आहेत. योगा केल्याने त्यांचे शारीरिक आरोग्य तर सुधारतेच, पण मानसिक आरोग्यही सुधारते. जर तुम्हाला तुमचे शरीर सुडौल आणि सुंदर बनवायचे असेल किंवा तणावमुक्त राहायचे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत योगाचा समावेश करू शकता.लोक त्यांच्या जीवनशैलीत योगाचा समावेश करतात, परंतु अनेकदा ते करताना काही चुका करतात, ज्याचा त्यांच्या शरीरावर परिणाम होतो.
 
योग्य ठिकाणी योगा करा 
योगा करण्याचा पहिला नियम म्हणजे योग्य ठिकाणी योगा करा नेहमी मोकळ्या हवेत योगा करा. कधीही बंद खोलीत योगा करू नका. गोंगाट्याच्या ठिकाणी कधीही योगा करू नका. 
रिकाम्या पोटी योगा करा 
कधीही जेवण केल्यावर योगा करू नका. असं केल्याने पचनाशी संबंधित आजार होऊ शकतात. रात्री योगा करायचा असल्यास जेवण केल्याच्या 3 ते 4 तासानंतर योगा करा.
 
योग्य पोश्चर 
योगा कधीही तज्ञाच्या शिवाय करू नका. ते नीट समजून आणि शिकल्यावरच करा.चुकीचे योगासन केल्याने आरोग्याच्या तक्रारी उदभवू शकतात.
नीट शिकूनच एकट्याने योगाचा सराव करा.
 
दबावाखाली योगा करू नका 
योगा करताना कठीण आसनांना बळजबरी करण्याचा प्रयत्न करू नका. असं केल्याने त्रास होऊ शकतो. अवघड आसन असल्यास हळूहळू सराव करण्याचा प्रयत्न करा. 
 
आजारपणात योगा करू नका 
तुम्ही आजारी असल्यास योगा करू नका. अशा वेळी ध्यानच करा जेणे करून तुम्हाला मानसिक बळ मिळेल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit