सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (16:53 IST)

Yoga For Hair : दररोज करा हे योगासन, गळत असलेल्या केसांपासून मुक्ती मिळेल, दुप्पट वेगाने वाढतील केस

पुरुष असो वा स्त्री केस गळती या समस्येला सर्वांना सामोरा जावं लागतं. हल्ली सर्वांना फीट आणि आकर्षक दिसायचं असतं. म्हणून वाढत्या वयात लोकं आपल्या केसांकडे देखील अधिक लक्ष देतात. हल्ली केस गळती सामान्य समस्या झाली आहे ज्याचे कारणं- ताण, चुकीचा आहार, चुकीची लाइफस्टाइल, चुकीच्या सवयी, हार्मोनल असंतुलन, हेयर कलरिंग, हेयर स्टाइलिंग प्रोडक्ट, स्मोकिंग, औषधं, अनुवांशिक विकार इतर असू शकतात. येथे आम्ही आपल्याला अशा योगासन बद्दल सांगत आहोत, जे केल्याने केस गळतीसारख्या समस्यापासून मुक्ती मिळू शकते-
 
टक्कल पडण्यापासून वाचवेल योगासन | Yoga to prevent balness
गळणाऱ्या केसांमुळे तुम्ही हैराण आहात आणि वेळेआधीच टक्कल पडणार आहात का? ज्यांना केस गळण्याची समस्या भेडसावत आहे, त्यांनी दररोज हा योगासन करावा. यामुळे डोक्याचे केस बळकट होतील आणि गेलेले केसही परत येण्याची शक्यता असते. बालायाम तुमच्या समस्येवर उपाय असू शकतो. बालायाम म्हणजे केसांचा व्यायाम. केस अकाली धूसर होणे आणि पडणे टाळण्यासाठी योग आणि एक्यूप्रेशरचे हे संयोजन हा एक सोपा आणि प्रभावी पर्याय आहे, ज्याचा बाबा रामदेव यांनी त्यांच्या योगामध्ये देखील समावेश केला आहे.
 
बालायाम विधी | Balayam Method
हे अत्यंत सोपं आसन आहे. यासाठी आपल्याला दोन्ही हाताच्या चार बोटांचे नख आपासात घासायचे आहेत. जितक्या वेळेस शक्य असेल तितक्या वेळ असे करावे. वेळी-अवेळी करणे शक्य नसेल तर किमान नियमाने ब्रेकफास्टपूर्वी आणि लंचपूर्वी तसेच रात्रीच्या जेवण्यापूर्वी 10 मिनिटापर्यंत याचा सराव करावा. सकाळी उपाशी पोटी देखील हे करता येईल.
 
बालायाम योगाचे फायदे | Benefits Of Balayam Yoga
बालायाम योग केल्याने केस गळतीची समस्या दूर होते.
याने ब्लड सर्कुलेशनमध्ये वृद्धी होते.
याने केसांना पोषण मिळतं.
दररोज असे केल्याने हृदय आणि फुफ्फुसाच्या अनेक समस्या दूर होतात.
याशिवाय पांढऱ्या केसांची समस्याही दूर होते.