बुधवार, 15 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 6 डिसेंबर 2021 (12:04 IST)

जिम जाणे योग्य की योगा करणे, जाणून घ्या अंतर

yoga or gym better for health
हल्ली अखाडाऐवजी जिमचा क्रेझ वाढत चालला आहे. आता प्रश्न असा आहे की जिममध्ये व्यायाम करणे योग्य आहे वा योगा करणे? दोन्हीमध्ये काय फरक आहे. याने काय फायदे आणि काय नुकसान आहे. जाणून घ्या खास 10 गोष्टी-
 
1. जिममध्ये हार्ड वर्क जेव्हाकी योगामध्ये सॉफ्ट व्यायाम होतात.
2. जिममध्ये इक्वीपमेंट्सने व्यायाम केला जातो तर योगामध्ये कोणत्याही उपकरणांची गरज भासत नाही.
3. जिममध्ये लोक बॉडी बनवण्यासाठी जातात जेव्हाकी योग तारुण्य राखण्यसाठी तसेच आरोग्य राखण्यासाठी केलं जातं.
4. जिममधील व्यायामामुळे हार्टवर प्रेशर येतं कारण यात अधिकाधिक कार्डिओ एक्सरसाइज असतात जेव्हाकी योगा केल्याने हार्टवर कोणत्याही प्रकाराचा दबाव बनत नाही.
5. जर आपल्याला बॉडी स्पर्धेत भाग घेयचा असेल, कुश्ती लढायची असेल, हीरो बनायचं असेल किंवा वजन उचलायचं असेल तर जिम जावं नाही तर केवळ निरोगी राहून तारुण्य जपण्यासाठी योगा करावं.
6. जिमध्ये व्यायाम केल्यानंतर थकवा जाणवतो. जेव्हाकी योगासन केल्याने आधीपेक्षा अधिक फ्रेश जाणवतं. जिमची आवश्यकता नसल्यास व्यर्थ शरीराला थकवण्याची गरज नाही.
7. जिममध्ये हाडांसह स्नायूं देखील हार्ड होतात. जिम सोडल्यानंतर बनावटी हार्डनेस व्यक्तीला वयापूर्वी व्यस्कर करते असे मानले जाते. जेव्हाकी योगाने हाडं क्लेकसिबल होतात.
8. जिममध्ये जाणार्‍याचं शरीर हार्ड, कसलेलं दिसतं जेव्हा की योगाने शरीरात लवचिकता येते.
9. जिममध्ये जाणार्‍यांना अतिरिक्त आहाराची गरज असते. जेव्हाकी योगा करणार्‍यांना अतिरिक्त भोजनची आवश्यकता नसते. तरी रोग प्रतिकारक शक्ती चांगली असते.
10. जिममध्ये व्यायाम करण्यास सोडल्यानंतर शरीर सुटु लागतं म्हणून व्यायाम निरंतर ठेवणं गरजेचं असतं नाहीतर हात-पाय दुखु लागतात. वय वाढल्यावर सांधेदुखीचा त्रास होता. स्नायूंमध्ये खेचाव जाणवतो. जेव्हाकी योगा काही दिवस नाही केलं तरी शरीर सक्रिय राहतं.