मान दिसते लठ्ठ, तर करा या योगासनांचा अभ्यास  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  शरीर आणि चेहऱ्याचे सौंदर्य सडपातळ मानेने वाढते. मानेवर मागे आणि पुढे जमलेली अतिरिक्त चरबी, चेहऱ्याचे आकर्षण खराब करते. कोणताही ड्रेस किंवा शर्ट, जाॅ लाइन आणि सडपातळ मान सौंदर्य वाढवते. शरीरातील अनेक भागातील चरबी कमी करण्यासाठी तसेच सोबत मानेतील चरबी कमी करण्यासाठी काही योगासनांचा अभ्यास करावा. चला तर जाणून घेऊ या कोणते आहेत हे योगासन ज्यामुळे मान आणि पाठीमधील चरबी कमी होण्यास मदत होईल.  
				  													
						
																							
									  
	 
	भुजंगासन
	भुजंगासनच्या अभ्यासाने मान आणि गळ्यात असलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत मिळते तसेच वजन कमी होते. भुजंगासनच्या अभ्यासासाठी पोटाच्या बाजूने झोपून हातांना डोक्याच्या दोन्ही बाजूंनी जमिनीवर टेकवा. आता तळहातांना खांद्याच्या बरोबर नेऊन दीर्घ श्वास घ्या. तसेच हात जमिनीवर ठेऊन बेंबी वरती उचला. डोके, छाती आणि पोटाचा भाग वरती उचला. आता डोक्याला वरच्या बाजूला सापाच्या फण्याप्रमाणे उचला. काही वेळ याच स्थितीमध्ये रहा व नंतर पूर्वस्थितीमध्ये यावे. 
				  				  
	 
	ताडासन 
	या योगाच्या नियमित अभ्यासाने शरीराच्या मांसपेशी आणि हाडांवर सकारात्मक प्रभाव पडतो. तसेच मानेवरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. ताडासनचा अभ्यास करण्यासाठी दोन्ही पायाच्या पंजांनामिळवून सरळ उभे राहा. हातांना डोक्याच्या वरती उचलून बोटांना एकमेकांना जोडून तळहातांना वरच्या बाजूला ठेवा. आता दृष्टी एका बिदूवर ठेवा. श्वास घेतांना खांदे आणि छाती वरच्या बाजूला ओढा. आता टाचांना वरच्या बाजूला उचलून तळपायांवर उभे राहा. पूर्ण शरीराला वरच्या बाजूने घेऊन जाऊन काही सेकंद श्वास थांबवून ठेवा. व याच स्थितीमध्ये उभे राहा. आता श्वास सोडून पूर्व स्थितीमध्ये या. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	उष्ट्रासन
	उष्ट्रासनचा अभ्यासासाठी जमीनवर गुडग्यांवर बसून दोन्ही हातांना कुल्यांनवर ठेवा. मग गुडग्यांना खांद्यांच्या समांतर घेऊन जा. आता मोठा श्वास घेऊन मेरुदंडाच्या शेवटच्या हाडावर पुढच्या बाजूने दबाव टाका. यादरम्यान पूर्ण दबाव बेंबीवर जाणवेल. हातांनी पायाला पकडा. कमरेला मागच्या बाजूने वाकवा. या स्थितीमध्ये 30 ते  60 सेकंद राहिल्यानंतर पूर्व स्थितीमध्ये यावे. 
				  																								
											
									  
	अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
				  																	
									  Edited By- Dhanashri Naik