मंगळवार, 21 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : सोमवार, 15 एप्रिल 2024 (10:12 IST)

Yoga : वृक्षासन अभ्यास करण्याची योग्य पद्धत, जाणून घ्या फायदे

sthirata shakti yoga benefits
योगाचा अभ्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कधी कधी अभ्यास करतांना चुकीचे आसन, स्थिति, श्वास घेण्याच्या चुकीच्या पद्धतीने आरोग्याला नुकसान देखील होऊ शकते. जर तुम्ही योगाभ्यास करणार आहात तर आसन-योगासनचा अभ्यास नक्की करा. आसनयोग मध्ये वृक्षासन सहभागी आहे. ज्याला इंग्लिशमध्ये ट्री -पोज म्हणतात. नावाप्रमाणे असलेले वृक्षासन मध्ये शरीर वृक्षासनच्या मुद्रामध्ये असते आणि त्यामध्ये संतुलन बनुन राहते . 
 
वृक्षासनचे फायदे- 
वृक्षासन संतुलन बनवणारे आसन आहे. ज्यामध्ये शारीरिक आणि भावनिक आरोग्य दोन्ही संतुलित राहण्यासाठी मदत मिळते. वृक्षासन पाय, घोटा, पोटरी, गुडगे, मांडया यांच्या स्नायूंना मजबूत बनवते. हे आसन केल्याने एकाग्रता वाढते. मज्जातंतूची समस्या असल्यास हे आसन केल्याने आराम मिळतो. वृक्षासन पाठीचाकणा मजबूत बनवते. तसेच गुडगे देखील मजबूत बनवते. वृक्षासन हे डोळे, कान, खांदे, मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. या आसनामुळे छातीची रुंदी वाढण्यास मदत होते. 
 
वृक्षासन करण्याची योग्य पद्धत- वृक्षासनच्या अभ्यासासाठी सरळ उभे रहा. डाव्या गुडग्याला वाकवून डावा पाय उजव्या मांडीवर ठेवावा. उजवा पाय सरळ ठेऊन शरीराचे संतुलन बनवा. हातांना डोक्याच्या वरती घेऊन आता तळहातांना एकमेकांना मिळवून नमस्कार मुद्रमध्ये घ्या. काही वेळपर्यंत याच मुद्रेमध्ये राहावे. मग श्वास सोडून सामान्य स्थितीत परत या. 
 
सावधानी- वृक्षासनचा अभ्यास सुरक्षित आहे आणि कोणीही हे आसन करू शकत. पण जर उच्च रक्तचाप असेल तर हे आसन डॉक्टरांचा सल्ला घेऊन किंवा एखाद्या विशेषज्ञ समोर अभ्यास करा ज्यांना उच्च रक्तचाप आहे त्यांनी वृक्षासन करतांना हात वरती न घेऊन जाता छातीजवळ नमस्कार मुद्रमध्ये ठेवा. वार्टिंगो किंवा मायग्रेनची समस्या असेल तर हे आसन करू नये. 
 
योग्य वेळ- वृक्षासनचा अभ्यास सकाळीच केला गेला पाहिजे. पण सकाळी वेळ मिळत नसल्यामुळे जर तुम्ही हा  अभ्यास संध्याकाळी करत असाल तर जेवण करण्यापूर्वी 4 ते 5 तास अगोदर करावा. लक्षात ठेवा की आसन करण्यापूर्वी शौचाल्यास जावून यावे म्हणजे पोट रिकामे असावे. वृक्षासनच्या अभ्यासापूर्वी त्रिकोणासन, वीरभद्रासन 2 आणि बद्ध कोणासन केले पहिजे. सोबतच वृक्षासनच्या अभ्यासानंतर उभे राहून केले जाते तेच आसन करावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik