शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : सोमवार, 21 जून 2021 (18:23 IST)

International Yoga Day 2021 :हे 4 आसन मासिक पाळीच्या त्रासातून आराम देतात

प्रत्येक वर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन जगभरात साजरा केला जातो.हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश्य म्हणजे लोकांना योगाबद्दल जागरूक करणे आहे.योगा आपले शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवण्यास मदत करते. असे अनेक योगासन आहेत ज्याद्वारे आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांमधून आराम मिळतो.अशा परिस्थितीत लोक हे योगासन करतात.काही योगासन असे आहेत,जे स्त्रियांच्या मासिक पाळीत होणाऱ्या वेदनेपासून आराम देतात चला जाणून घेऊ या. 
 
1 बटरफ्लाय आसन-या आसनाला बटरफ्लाय किंवा फुलपाखरू आसन म्हणतात.हे केल्याने स्त्रियांना फायदा होतो.या मध्ये आपल्याला पाय समोरच्या बाजूने पसरवून बसायचे आहे.पाठीचा कणा ताठ ठेवायचा पाय गुडघ्यापासून दुमडून ओटीपोटाजवळ आणा दोन्ही हाताने पाय घट्ट धरून ठेवा.टाचा जननेंद्रियांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा.लांब आणि दीर्घ श्वास घ्या.श्वास सोडत गुडघे आणि मांडीवर दाब टाका ज्या प्रकारे फुलपाखरूआपले पंख हलवते त्याच प्रकारे आपल्याला आपले पाय वरखाली करायचे आहे.या दरम्यान पायाला वेगाने हलवा आणि श्वास घ्या नंतर श्वास सोडा.सुरुवातीस हळू-हळू करा नंतर सराव वाढवल्याने आपल्याला अधिकच फायदा मिळेल.  
 
2 मार्जरी आसन-या आसनात आपल्याला पुढे वाकायचे आणि मागे वळायचे आहे.असं केल्याने पाठीच्या कणाला एक ताण होतो.या व्यतिरिक्त पाठ दुखी,कंबर दुखी,आणि मानदुखी मध्ये आराम देण्याचे काम करतो.म्हणून स्त्रियांच्या मासिक पाळीत हे आसन करणे फायदेशीर मानले आहे.
 
3 वज्रासन-हे करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पायाला जमिनीवर पसरवून बसायचे आहे ,हात बाजूला ठेवा. उजव्या पायाच्या गुडघ्याला दुमडून कुल्ह्याच्या खाली ठेवा.त्याच प्रमाणे डाव्या गुडघ्याला दुमडून कुल्ह्याच्या खाली ठेवा.टाचा या प्रकारे ठेवा की पायाचे बोट एकमेकांवर नसावे.आता दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा आणि या दरम्यान पाठीचा कणा ताठ ठेवा डोळे मिटून घ्या.या अवस्थेत आपल्याला 5-10मिनिटे बसायचे आहे.
 
 
4 उष्ट्रासन-या आसनांमध्ये आपल्याला गुडघ्याच्या मदतीने चटईवर बसायचे आहे आणि दोन्ही हात कुल्ह्यावर ठेवायचे आहे.लक्षात असू द्या की गुडघे आणि खांदे समांतर असावे तळपाय आकाशाकडे असावे.श्वास घेत पाठीचा कणा ताणून घ्या आणि मानेवर कोणताही दाब न देता तसेच बसून राहा.या स्थितीत श्वास घ्या आणि श्वास सोडत पूर्वस्थितीत या.हाताला कंबरेवर ठेवा आणि सरळ व्हा.