1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (17:30 IST)

कुंभकासन Plank Pose Or Kumbhakasana

Plank Pose step by step
कुंभकासनाचा नियमित सराव हाडांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. याचा नियमित सराव केल्याने तुमच्या खांद्याची हाडेही मजबूत होतात. दररोज योग्यरित्या सराव केल्याने ओटीपोटाचे आणि नितंबाचे स्नायू तसेच पाठीचा कणा मजबूत होतो. कुंभकासनाचा सराव केल्यास हिवाळ्यात शरीराचे तापमान वाढते.
 
कुंभकासनाचा सराव कसा करावा
कुंभकासनाचा सराव करण्यासाठी सर्वप्रथम योग चटईवर पाळथी घालून बसा.
आपले शरीर प्लँकसाठी तयार करा.
सर्व प्रथम, दोन्ही हातांनी मुठी बनवून, 10 वेळा क्लॉकवाइज आणि 10 वेळा अँटीक्लॉजवाइज दिशेने फिरवा.
आपले दोन्ही हात आपल्या समोर चटईवर ठेवा. दोन हातांमधील अंतर खांद्याइतके असेल.
मागून हळू हळू गुडघे वर करा आणि पायाच्या बोटांवर या आणि कुंभक मुद्रेत या.
या आसनात सर्व दाब आपल्या हातावर, पोटावर, नितंबांवर आणि मांडीवर पडतील.
15-20 सेकंद असेच राहा आणि परत या आणि आराम करा.
हळूहळू काउंट वाढवत 1 मिनिटापर्यंत घेऊन जा.