1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (19:46 IST)

सांधेदुखी किंवा मणक्यातील समस्या,दूर करण्यासाठी हे योगासन करा

Do this yoga pose to get rid of joint pain or spinal problems सांधेदुखी किंवा मणक्यातील समस्या
खराब जीवनशैली आणि आहारातील गडबड यामुळे गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये हाडांशी संबंधित आजार होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. यामध्ये देखील लोकांमध्ये सांधेदुखी आणि पाठीच्या कण्याशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत
 
 सांधेदुखीसारख्या समस्या आता फक्त वृद्धांनाच नाही  तरुणांनाही या समस्येने ग्रासताना दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते, कालांतराने लोकांमध्ये शारीरिक निष्क्रियता कमी होणे हे याचे प्रमुख कारण मानले जाऊ शकते.
 
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सांधेदुखी असो किंवा पाठीच्या कण्याशी संबंधित समस्या, नियमित योगासने केल्यास या सर्व समस्यांपासून सुटका मिळू शकते. अशी अनेक योगासने आहेत जी शरीराची लवचिकता आणि सांधे समस्यांवर अतिशय प्रभावी मानली जाते. अशा परिस्थितीत, जर आपण ही हाडांशी संबंधित समस्याशी ग्रस्त असाल, तर आतापासून या योगासनांचा सराव सुरू करा. काही महिन्यांतच आपल्याला त्याचे फायदे दिसतील. चला तर मग जाणून घेऊ या कोणते आहे हे आसन.
 
1 कोब्रा पोज योग -कोब्रा पोज किंवा भुजंगासन योगाचा सराव हाडे आणि सांधे यांच्या बळकटीसाठी खूप फायदेशीर मानला जातो. योग तज्ञांच्या मते,या आसनाचा नियमित सराव पाठीचा कणा आणि कंबर मजबूत करण्यासाठी आणि शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी  उपयुक्त आहे. ज्यांना मणक्याशी संबंधित समस्या आहेत किंवा पाठीच्या खालच्या भागात वेदना होत असेल अशा लोकांनी दररोज कोब्रा पोज योगाचा सराव करणे खूप फायदेशीर ठरू शकते. 
 
2 ब्रिज पोज योग-ब्रिज पोज किंवा सेतुबंधासन योगाचा सराव कूल्हे, कंबर आणि गुडघे यांच्या सांधे आणि स्नायूंसाठी खूप फायदेशीर मानला जातो. विशेषत: पाठदुखीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांसाठी हे योगासन खूप फायदेशीर आहे. हे योगासन करण्यासाठी पाठीवर झोपावे. खांद्याच्या रुंदीपेक्षा किंचित अंतरावर आपले गुडघे वाकवा. तळवे उघडे ठेवून हात जमिनीवर सरळ ठेवा. आता श्वास घेताना कंबरेचा भाग वर उचला, खांदे आणि डोके सपाट जमिनीवर ठेवा. श्वास सोडताना, मागील पूर्वस्थितीत परत या. 
 
3 वीरभद्रासन-शरीराच्या सर्व सांध्यांचे उत्तम आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी वीरभद्रासन आसन सर्वात फायदेशीर मानला जातो.कुल्हे , गुडघा आणि पुढील पायाची हाडे मजबूत करण्यासाठी आणि शरीराची लवचिकता सुधारण्यासाठी या योगाचा सराव फायदेशीर मानला जातो. वीरभद्रासन आसन केवळ हाडांसाठीच फायदेशीर नाही, तर शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठीही हा योग अत्यंत फायदेशीर मानला जातो. त्याचा नियमित सराव केल्याने शरीरास फायदेशीर आहे.