शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 जून 2021 (17:18 IST)

World Yoga Day 2021 :योगाचे 7 प्रमुख प्रकार जाणून घेऊ या

21 जून 2021 रोजी जागतिक योग दिन साजरा होणार आहे.योगा मध्ये एकूण 84 योगासन असतात परंतु योग किती प्रकारचे आहेत चला जाणून घेऊ या महत्त्वाची माहिती. 
 
प्रामुख्याने योगाचे 7 प्रकार आहेत-
1.हठयोग, 2.राजयोग, 3.कर्मयोग, 4.भक्तियोग, 5.ज्ञानयोग, 6. तंत्रयोग आणि 7. लययोग
 
1 हठयोग- षट्कर्म ,आसन,मुद्रा,प्रत्याहार ,ध्यान,आणि समाधी -हे हठयोगाचे 7 भाग आहे,परंतु हठयोगीचा जोर आसन आणि कुंडलिनी जागृत करण्यासाठी आसन ,बंध,मुद्रा आणि प्राणायामावर जास्त असतो. हीच क्रिया योग आहे.
 
2 राजयोग - यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधि हे पतंजली च्या राजयोगाचे 8 अंग आहेत.यांना अष्टांग योग देखील म्हणतात.
 
3 कर्मयोग- कर्म किंवा कृती करणेच कर्मयोग आहे.याचा मुख्य हेतू कामात कौशल्य आणणे आहे.हेच सहज योग आहे.
 
4 भक्ती योग-श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन हे 9 अंग नवधा भक्तीचे  म्हटले जाते.हेच भक्तियोग आहे.
 
5 ज्ञान योग- साक्षीभाव द्वारे आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाची प्राप्ती करणे ज्ञान योग आहे.हेच ध्यान योग आहे. हेच ब्रह्मयोग आणि सांख्य योग आहे.
 
6 तंत्र योग-हा वाम मार्ग आहे.ज्यामध्ये पुरुष आणि स्त्री एकत्ररित्या इंद्रियांवर संयम राखून योग करतात. हेच कुंडलिनी योग देखील आहे.
 
7 लययोग -यम, नियम, स्थूल क्रिया, सूक्ष्म क्रिया, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि  समाधि. हे आठ लययोगाचे भाग आहे.