सोमवार, 14 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2022 (21:59 IST)

पांढऱ्या केसांचा त्रास दूर करतील हे योगासने, काही दिवसातच परिणाम मिळेल

केसांशी संबंधित काही सामान्य समस्यांमध्ये केस गळणे, कोंडा होणे, केस पातळ होणे, टक्कल पडणे, अकाली पांढरे होणे इ.समस्याला दूर करण्यासाठी निरोगी आहार घेणे अवश्यक आहे.त्याशिवाय चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. 
 
अयोग्य खाण्याच्या सवयी, अपुरी झोप, जास्त प्रक्रिया केलेले अन्न खाणे आणि पालेभाज्या पुरेशा प्रमाणात न खाणे यामुळे त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. 
 
केस गळणे, पांढरे होणे , कोंडा होणे या सारख्या समस्या टाळण्यासाठी नियमितपणे योगासन केल्यावर केसांचा नैसर्गिक रंग मिळण्यास मदत होते. चला या योगासनांबद्दल जाणून  घेऊ या.
 
1 बालयम मुद्रा -
नखे घासण्याची प्राचीन भारतीय प्रथा योगाच्या संदर्भात 'बालयम' म्हणून ओळखली जाते. बालयम हा संयुग शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे - 'बाल' म्हणजे मूळ आणि 'आयाम ' म्हणजे व्यायाम. त्यामुळे मुळात बालयम, किंवा नखे ​​घासणे हा केसांचा व्यायाम आहे.
 
कसे करावे-
* बोटे आतून फिरवून अर्धी मुठ करा.
* अंगठा बाहेर काढा.
* तळवे समोरासमोर ठेवून नखांना एकमेकांना स्पर्श करू द्या.
* आता एका हाताची नखे दुसऱ्या हाताच्या नखांवर वेगाने वर-खाली करताना घासून घ्या.
* लक्षात ठेवा, फक्त नखांनाच घासायचे आहे, अंगठ्याला नाही.
 
2 हलासन-
* हे करण्यासाठी सर्वप्रथम पाठीवर झोपा.
* पाय वर करून हाताने जमिनीवर वर दाब द्या,आणि पाय डोक्याच्या मागे न्या.  *आधारासाठी तळहातांनी तुमच्या पाठीला आधार द्या.
* काही वेळअशाच स्थितीत राहा.
 
3 शीर्षासन -
* वज्रासनाच्या स्थितीत बसा आणि हात पुढे करत असताना कोपरे  जमिनीवर ठेवा.
* दोन्ही हातांची बोटे घट्ट जोडून , डोक्याच्या मध्यभागी घेऊन खाली टेकवून घ्या.
* पायाच्या बोटांच्या मदतीने खालचा भाग वर आणा, यामुळे शरीर त्रिकोणाच्या आकारात येईल.
* कोपऱ्यांना  जमिनीवर घट्ट टेकवून ठेवा आणि हळूहळू पाय वर करा.
*,दोन्ही पाय एकत्र उचलण्याऐवजी, तुम्ही त्यांना एक-एक करून उचलू शकता.
* काही वेळ या स्थितीत राहा आणि नंतर पाय हळूहळू खाली आणा. संपूर्ण आसन पुन्हा करा.
 
मानदुखी, स्पॉन्डिलायटिस आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन करू नये.