Festival Posters
✕

अंक ज्योतिष : मूलांक 6 भविष्यफळ 2021

Updated: मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (09:22 IST)
 
करिअर साठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
करिअरच्या दृष्टीने हे वर्ष सकारात्मक राहील आणि हे आपल्याला शिकवेल की कुटुंबाच्या शिवाय आपला वेळ कामात कसा घालवता येऊ शकतो. व्यावसायिकांसाठी हे वर्ष 2021 नवीन संधी घेऊन येत आहे. या संधीला गमावू नका. कारण मजा करणे हे आपल्या कामात व्यत्यय आणू शकतो. हे वर्ष आपल्या व्यवसायासाठी खूप चांगले राहील. या साठी आपल्याला एखादे कर्ज घ्यावयाचे असेल तर आपण घेऊ शकता. हे वर्ष परदेशी कामासाठी चांगले राहील. नोकरदार वर्गासाठी हे वर्ष बढतीचे मार्ग उघडत आहे. अधिकारी वर्गाच्या नजरेत देखील यश मिळविण्याची चिन्हे दिसून येत आहे. या वर्षात कामा निमित्त प्रवास होतील त्याचे परिणाम आनंददायी असतील. वर्षाच्या मध्यकाळात कार्यक्षेत्रात काही सहकारी लोकांमुळे त्रास संभवतात, या काळात जपून चालावे  लागेल. जर आपण बदली चा विचार करीत आहात तर वर्षाच्या अखेरीस बदली साठी चांगली वेळ आहे, ज्यामुळे आवडीच्या ठिकाणी बदली होईल. हा काळ नव्या नोकरीसाठी चांगला असेल.
 
आर्थिक दृष्ट्या कसे असणार हे वर्ष 2021 : 
आर्थिक दृष्टीने हे वर्ष या मूलांकासाठी शुभ असेल. आपले कोणतेही काम पैशाच्या अभावी थांबणार नाही. मागील वर्षाचे सर्व स्वप्न या वर्षी पूर्ण होतील. या वर्षात पगारात बढतीमुळे आपल्याला फायदा होईल. आपण घर आणि वाहन खरेदीचा विचार करीत आहात तर आपल्याला पैशाची कमी भासणार नाही. गुंतवणुकीसाठी कर्ज घेण्यात काहीच अडचण येणारं नाही. हे वर्ष शेअर बाजारासाठी चांगले राहील. जुने आणि अडकलेले पैसे देखील जुलै नंतर परत मिळतील. या वर्षात पालकांकडून आर्थिक मदत मिळेल. आपण बहीण-भावंडांना देखील आर्थिक मदत कराल. वर्षाच्या अखेरीस आपल्या मित्राला आर्थिक मदतीची गरज जाणवेल, आपण मदत केली तर ते पैसे परत येण्याची शक्यता नसेल. पैसे परत येण्याची अपेक्षा ठेवू नका.
 
प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनासाठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
या मूलांकाचे लोकं आपल्या नात्याला घेऊन अत्यंत संवेदनशील राहतात, या वर्षी देखील त्यांचे व्यवहार काही असेच राहतील. आपल्या कुटुंबात आपण आपल्या नात्याबद्दल काहीसे अस्वस्थ व्हाल. कारण आपण आपल्या प्रिय व्यक्ती समवेत कमी वेळ घालवाल. कारण आपले काम त्यासाठी आपला साथ कमी देईल. आपण एकटे असाल तर वर्ष 2021 मध्ये आपण एकटे राहणार नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला इच्छित जोडीदार मिळेल. विवाहित लोकांसाठी हे वर्ष पूर्वीच्या वर्षापेक्षा चांगले असेल. आपण जोडीदारासह वेळ घालवाल आणि सर्व जुन्या तक्रारी आणि रुसवे-फुगवे संपतील. आपल्याला जोडीदाराच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांना भावनिक आधार दिला पाहिजे. 
 
आरोग्यासाठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
मूलांक 6 साठी हे वर्ष 2021 आरोग्याच्या दृष्टीने मिश्रित फळ देणारे राहील. आपण आपल्या कामांसह आपल्या आरोग्याची काळजी देखील घेतली पाहिजे. काही त्रास जाणवत असेल तर त्वरितच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर आपल्याला पोटाशी निगडित काही त्रास आहे तर निष्काळजी पणा करू नका, खाण्या-पिण्याचे पथ्य सांभाळा. बाहेरचे खाणे कटाक्षाने टाळा. जून महिन्यानंतर एखाद्या अपघातामुळे दुखापत होऊ शकते. वाहन काळजीपूर्वक चालवा आणि रागाच्या भरात घरातून बाहेर जाऊ नका.

सर्व पहा

शुक्र ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करावयाचे सोपे आणि प्रभावी उपाय

Shradh Paksha 2026: श्राद्ध पक्षातील चतुर्दशी तिथीचे महत्त्व, श्राद्ध कसे आणि कोणासाठी केले जाते?

नवरात्रीच्या उपवासासाठी राजगिरा लाडू घरीच कसे बनवायचे? पाक न करता सोपी पद्धत

विंध्यचलच्या विंध्यवासिनी देवीचे दर्शन का मानले जाते महत्त्वाचे? मंदिराची कथा आणि यात्रा

Sarv Pitru Amavasya 2026 सर्व पितृ अमावस्येला महादेवाला या ५ वस्तू अर्पित करा

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments