Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशीफल 18 ते 24 एप्रिल 2021

Updated: सोमवार, 19 एप्रिल 2021 (19:36 IST)
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात सर्वत्र परिश्रम व दगदग वाढेल व जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. शांतता ठेवणेच उचित स्वरूपाचे ठरू शकेल व होणारा मनस्ताप टळेल. शांतता टिकून राहील. इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहू नये. अंतिम चरणात शुभ कार्यानिमित्त प्रवास करावा लागेल व सर्वत्र नशिबाची साथ पाठीमागे राहील. कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित राहून आपला शब्द अंतिम प्रमाण स्वरूप मानला जाईल. 
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून अपेक्षित स्वरूपाचा लाभ घडेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार वा स्वीकार जरूर जरूर करावा. भावी काळासाठी लाभदायक ठरू शकेल. अंतिम चरणात वाहन पिडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करू नये. यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम करूनही तितके यश मिळणे अवघड़ 
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटण्याच्या मार्गावर येतील व आरोग्य चांगले राहील. तसेच विरोधक मंडळीचा ससेमिरा व त्रास काही प्रमाणात कमी होऊन यशाचा मार्ग खुलाच राहील. अंतिम चरणात भागीदारीत असणारे वादविवाद मिटण्याच्या दृष्टिक्षेपात येतील व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहू शकेल. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे मनोनुकूल व चांगले दूरध्वनी येतील व सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकेल. 
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये यश मिळेल. संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येतील. सर्वत्र यश दृष्टिक्षेपात ठेवणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक आवक समाधानकारक राहू शकेल व खर्चावर नियंत्रण राहील. अंतिम चरणात विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवूनच वाटचाल करतील. नेत्रदीपक प्रगतीचा मार्ग खुलाच राहील. कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व कायम राहून दबदबा वाढीस लागेल. 
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारीक आनंद वाढेल. कौटुंबिक सदस्य मंडळींबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल. मानसिक सुखशांती कायम स्वरूपात राहील. अंतिम चरणात संततीबाबत असणारी एखादी बातमी मिळेल. आर्थिक अस्थिरता दूर होण्याच्या स्थितीत राहून आर्थिक व्यवहार कामे सुरळीतपणाच्या मार्गावर राहतील. अपूर्ण व स्थगित कामे गतिवान होऊन पूर्ण होतील. 
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात सहकारी वर्गाचे सहकार्य वेळेवर लाभेल. कोणतेही काम अपूर्ण अवस्थेत राहणार नाही. क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात आपले वर्चस्व वाढेल व बक्षीसपात्र स्थिती कायम राहू शकेल व यश समोर दिसेल. अंतिम चरणात कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक स्थितीत राहील. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील, अशी एखादी घटना व घडामोडी घडून येतील व मनावर असलेले काळजीचे सावट दूर होऊन उत्साह वाढेल. 
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल. आर्थिक स्थिती चढ-उतार स्वरूपात ठेवणारी ग्रहस्थिती ओहे. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवीचे मार्गदर्शन घेणे आवश्यक व उचित ठरेल. भावी काळात होणारे नुकसान काही प्रमाणात टळू शकेल. अंतिम चरणात कार्य सभोतालीन परिस्थिती अनुकूल राहील. कार्य क्षेत्रात जे कार्य इतरांकडून शक्य झाले नाही ते कार्य आपल्या हातून यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकेल. 
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल. मनावर असलेले काळजीचे सावट व दडपण मिटण्याच्या मार्गावर राहील. महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या कामासाठी प्रवास करावा लागून प्रवास कार्यसाधक स्वरूपाचाच सिद्ध होऊन उत्साह वाढीस लागेल. अंतिम चरणात पारिवारीक सदस्य मंडळीच्या आग्रहाखातर काही प्रमाणात सढळ हाताने पैसा खर्च करावा लागेल. मनातील कार्य योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्यास उपयुक्त कालखंड ठरेल. 
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात मनाविरुद्ध खर्चाच्या प्रसंगास सामोरे जावे लागेल व कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. शांतता ठेवणेच योग्य ठरेल व मानसिक अशांतता जाणवणार नाही. अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देणारी राहील व काळजीचे सावट मिटेल. महत्वपूर्ण स्वरूपाच्या घडामोडी अनुकूल ठरतील. कार्य क्षेत्रात मान सन्मान मिळवून देणारी कामगिरी हातून घडेल व यश लाभेल.  

सर्व पहा

Shubham Karoti Kalyanam शुभं करोति कल्याणम्, संध्याकाळी दिवा लावताना म्हणायची प्रार्थना

दीपपूजन २०२६: दिव्याची अमावस्या कधी आहे? या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते?

नागद्वारची आरती....आरती नागद्वारा शेषशाई अवतारा

श्रावणात महादेवांना बेलपत्र वाहण्याचे महत्व; significance of Belpatra

महादेवांचे सर्वाधिक लाडके हे ४ मूलांक; आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची कधीच कमतरता भासत नाही

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments