Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशीफल 25 ते 30 एप्रिल 2021

Updated: रविवार, 25 एप्रिल 2021 (07:33 IST)
 
कर्क- महत्वाच्या कामाबाबत गुप्तता बाळगणे हिताचे राहील. अकारण दुसर्‍याच्या वादात उडी घेऊ नका. न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण होईल असे वागणे संकटाला आमंत्रण ठरू शकेल. जवळच्या नातेवाईकांची साथ मिळेल. भागीदारीत नवीन व्यवसाय करण्याची संधी चालून येईल. मानसिक संतुलन ढासळल्याने आपत्तीजन्य स्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. खोल पाण्यात जाणे टाळावे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी येण्याची शक्यता आहे. शुभ तारखा : 25 ते 27
 
सिंह - आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा चांगला आहे. योग आणि व्यायामाला कमी पडू देऊ नका आणि शक्य तितक्या हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा. अनेक गोष्टी आपल्या समोर उभे राहतील तेव्हा जेव्हा आपले कुटुंब आणि आपले मित्र आधारस्तंभांसारखे उभे असतील. मित्र आणि कुटुंबाचा पाठिंबा देईल. कौटुंबिक वातावरणात आनंदाची लाट दिसेल. शुभ तारखा ः 26, 27
 
कन्या - जमिनीचे व्यवहार करण्यासाठी अत्यन्त शुभ आठवडा आहे. घरातील सुभोभिकरणाच्या अथवा गृहउपयोगी वस्तू खरेदी करु शकाल. प्राकृतिक कारणाने विचलितपणा निर्माण होण्याची शक्यता आहे. छोट्यामोठ्या शस्त्रक्रिया देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्तव्यात कसूर रहाणार नाही याची दक्षता घ्या. लाभाचे पद मिळण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होईल. वडिलोपार्जित संस्कारांचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग होईल. शुभ तारखा : 28, 29 
 
तूळ - महत्वाच्या कामाबाबत गुप्तता बाळगणे हिताचे राहील. अकारण दुसर्‍याच्या वादात उडी घेऊ नका. न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण होईल असे वागणे संकटाला आमंत्रण ठरू शकेल. जवळच्या नातेवाईकांची साथ मिळेल. भागीदारीत नवीन व्यवसाय करण्याची संधी चालून येईल. मानसिक संतुलन ढासळल्याने आपत्तीजन्य स्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. खोल पाण्यात जाणे टाळावे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी येण्याची शक्यता आहे. शुभ तारखा : 25 ते 27 
 
वृश्चिक - चांगल्या मित्रांच्या सहाय्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. मानसिक स्थिती उत्तम राहील. प्रसन्न मनाने घेतलेले हाती घेतलेलं काम यश प्राप्त करण्यास मदतगार ठरेल. विद्यार्थी दशेत नेत्रदीपक यशाकडे वाटचाल होईल अशा प्रकारच्या मानसिकतेने अभ्यास कराल. इष्ट ध्येय साध्य करण्यासाठी पूरक ग्रहस्थिती आहे. उत्तम आर्थिक फायदा मिळेल. आर्थिक स्थिती ही आधीपेक्षा अधिक मजबूत होतांना दिसेल. शुभ तारखा : 29,30
 
धनू - ठरविलेल्या दिशेने वाटचाल सुरु होण्यास मदतगार ग्रहस्थिती आहे. स्वतःच्या कर्तबगारीने कार्यपूर्तीस नेण्याची संधी उपलब्ध होईल. मन विचलित झाल्याने इष्ट ध्येय पूर्तीत विलंब लागू शकतो. प्राकृतिक स्थिती कमजोर रहाण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये अधिक जबाबदारी स्वीकारावी लागेल. कामकाजात काही प्रमाणात स्थित्यंतर दिसून येण्याची शक्यता आहे. घर खरेदीचे व्यवहार मार्गस्थ होऊ शकतील. शुभ तारखा : 26, 28 
 
मकर - खर्चावर काबू ठेवण्याची आवश्यकता मंद गतीने का होईना अपेक्षित दिशेने वाटचाल सुरु राहील. विद्यार्जनासाठी अत्यन्त दिशादर्शक काळ आहे. नोकरीमध्ये प्रशिक्षणासाठी जाण्याचे योग संभवतात. दुसर्‍याच्या व्यवहारात न पडणे हितकारक ठरेल. हितशत्रूंचा सुळसुळाट वाढण्याची शक्यता आहे. कामकाजातील गुपित उघड होणार नाहीत याची काळजी घ्या.शुभ तारखा : 25,28
 
कुंभ - आठवड्याची सुरुवात धावपळीच्या जीवनाने होत आहे. ठरवलेला मुकाम हस्तगत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतील. विरोधकांची मनधरणी करावी लागेल. अतिविश्वासाने कोणतेही निर्णय घेऊ नका. आठवड्याचा मध्यंतर काही प्रमाणात दिलासा देणारा असेल. न्यायालयीन विभागाशी संबंधित व्यवहार हाताळताना काळजी घ्या. डोकेदुखी सारखे विकार त्रस्त करतील. प्रवास टाळले हितकारक ठरतील. शुभ तारखा : 28,29

मीन - व्यापारी लोकांसाठी महत्वपूर्ण उलाढालीचा हा आठवडा आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा अपेक्षित लाभांश मिळू शकेल. तात्विक स्वरूपात केलेल्या कोणत्याही चर्चाना सकारात्मक प्रतिसाद मिळेल. पारिवारिक स्थिती उत्तम राहील. कामकाजात उत्तम प्रगती दिसून येईल. विविध वैविध्यपूर्ण गोष्टींमध्ये समरस होण्याची सवय फायदेमंद ठरेल. प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी होण्यासाठी, सतत यश मिळविण्यास सक्षम असल्याचे दिसून येईल. शुभ तारखा : 26,27

सर्व पहा

Raksha Bandhan Wishes for Brother in Marathi 2026 भावासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

'मोदी चालीसा': जिवंत व्यक्तींची पूजा आणि विधीवत उपासना करणे योग्य आहे का? हिंदू धर्माची तत्त्वे समजून घ्या

राखी खरेदी करताना या गोष्टी पाहिल्यात का? चुकीची राखी ठरू शकते अशुभ, जाणून घ्या काय काळजी घ्यावी

Jivati Katha Marathi श्रावण शुक्रवारी नक्की वाचा जिवतीची आणि देवीची ही पवित्र कहाणी

Jivati Puja 2026 Wishes in Marathi श्रावण शुक्रवार विशेष जरा जिवंतिका पूजनाच्या शुभेच्छा

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments