Dharma Sangrah

Astrology Zodiac Horoscope Taurus Bus.htm

Notifications

वृषभ वृषभ
व्यवसाय

आपल्या राशीच्या व्यक्ती नेहमी यशस्वी व्यापारी व गुंतवणूकदार असतात. आपली रास राशीचक्रातील धन राशी देखील म्हणवली जाते. ज्या क्षेत्रात लोक अयशस्वी होतात त्या क्षेत्रातून देखील आपण व्यापाराच्या संधी शोधून काढता. आपण विशेषत: संपत्तीशी संबंधित करारामधुन लाभ प्राप्त करता. या राशितील लोक विशेषकरून सोदर्याकडे विशेषे लक्ष देतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत कलात्मकता आवडते. ललित कला, दारू, हॉटेल, संगीत, तेल, गायन, नृत्य, कलाकार, अभिनेता, श्रंगार, सजावट करण्याच्या वस्तू, आभूषण, कलात्मक शिल्पकारी, चित्रकारी, तयार कपड्यांचा व्यापार, माळीकाम, विणकाम, मॉडेलिंग टेलरिंग फिल्म व्यवसाय फॅशन डिझायनिंग जाहिरात इत्यादी क्षेत्रात यश आहे.

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!मृत्यू हे या जगातील सर्वात मोठे आणि अटळ सत्य आहे. ज्याने जन्म घेतला आहे, त्याचा मृत्यू निश्चित आहे. हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या ‘गरुड पुराणात’ जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाचे अत्यंत सखोल वर्णन करण्यात आले आहे. आपण आयुष्यभर पैसा, घर, गाडी, मान-सन्मान आणि नातेवाईक जोडण्यात घालवतो. परंतु, जेव्हा प्राण शरीरातून निघून जातात, तेव्हा हे सर्व भौतिक सुख येथेच राहते. स्मशानात चितेवर आपले पंचमहाभूतांनी बनलेले शरीर जळून राख होते. मग मृत्यूनंतर आपल्यासोबत नेमके काय जाते? गरुड पुराणानुसार, शरीर नष्ट झाल्यानंतरही ‘या’ ५ सूक्ष्म गोष्टी आत्म्यासोबत पुढील प्रवासात जातात.