suvichar
✕

आता साध्या कंप्युटरवरूनही खेळता येणार पबजी गेम

Updated: सोमवार, 1 जुलै 2019 (12:29 IST)
 
लाईट व्हर्जन म्हणजे नेमकं काय? कोणासाठी?
आतापर्यंतच पबजीची पीसी व्हर्जन खेळण्यासाठी गेमर्सकडे चांगली स्पेसिफिकेशन्स असणारा कंप्युटर किंवा गेमिंग कंप्युटर असणं गरजेचं होतं. फार कमी जणांकडे अशा मशीन्स असतात आणि त्या खूप खर्चिक असतात.
 
याशिवाय त्यांच्याकडे अतिशय फास्ट इंटरनेट कनेक्शन असणंही गरजेचं होतं कारण याचा थेट फटका गेम खेळताना बसत होता. पण पीसी व्हर्जनच्या या गरजांमुळे गेमची ही आवृत्ती मोबाईल आवृत्ती एवढी लोकप्रिय झाली नाही.
 
ज्यांच्याकडे अशा स्पेसिफिकेशन्सची मशीन्स नव्हती, ते एम्युलेटर्सच्या मदतीने मोबाईल व्हर्जन पीसीवर खेळण्याचा प्रयत्न करत, पण गेमिंगचा तो भन्नाट इफेक्ट यातून मिळत नव्हता. म्हणून मग आता या पबजीची अशी आवृत्ती आणण्यात येत आहे, जी साध्या स्पेसिफिकेशन्सच्या कंप्युटरवही खेळता येईल. आणि ही आवृत्ती मोफत असेल.
 
कोणती पीसी स्पेसिफिकेशन्स गरजेची
ऑपरेटिंग सिस्टीम : विंडोज 7,8,10, 64 Bit
 
सीपीयू : Core i3, 2.4Ghz
 
रॅम : 4GB
 
GPU : Intel HD Graphics 4000
 
HDD - 4GB
 
काय असतील पबजी लाईटची वैशिष्ट्यं
हे व्हर्जन खास साध्या पीसीसाठी तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूणच गेमिंग एक्सपिरियन्स मोबाईल गेमिंगपेक्षा चांगला असेल. पबजीच्या मूळ व्हर्जनमधली सगळी फीचर्स यात असतील त्यामुळे गेमवर चांगला कन्ट्रोल असेल. शिवाय गेमची ही व्हर्जन मोफत उपलब्ध असेल. पण गेमर्सना गेममधले काही पर्याय किंवा बॅटल पासेस विकत घ्यावे लागतील अशी चर्चा आहे. याविषयीची अधिकृत माहिती अजून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
 
पबजी लाईट रजिस्ट्रेशन
पबजी लाईटसाठी रजिस्ट्रेशन करणं अगदी सोपं आहे. पबजीच्या ऑफिशियल साईटवर जाऊन 'जॉईन द इव्हेंट' (Join the event)वर क्लिक करून यासाठीची नोंदणी करता येईल. 3 जुलैपर्यंत ही नोंदणी सुरू असणार आहे.
 
ही नोंदणी करणाऱ्या अनेकांना काही मोफत गोष्टी किंवा बक्षीसंही मिळणार आहेत. गेममधल्याच एखाद्या गोष्टीच्या स्वरूपात ही बक्षीसं असतील. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पबजीकडून खेळासाठीचे स्किन कोड्स ईमेलने पाठवण्यात येतील.
 
कंपनीचा काय फायदा
पबजी मोबाईल हा सध्या जगामध्ये सर्वात जात कमार् करणाऱ्या गेम्सपैकी एक आहे. खरंतर हा मोबाईल गेम F2P मोडेलमध्ये म्हणजे फ्री-टू-प्ले (मोफत) देण्यात येतो. पण त्या गेममध्ये पुढच्या टप्प्यावर गेमर्सकडून विकत घेतल्या जाणाऱ्या स्किन्स आणि वस्तूंमधून कंपनीला उत्पन्न मिळतं.
 
पबजी लाईटचं बिझनेस मॉडेलही असंच असण्याचा अंदाज आहे. साध्या कंप्युटरवरहा हा गेम खेळता येणार असल्याने साहजिकच आता हा गेम पीसीवर खेळणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल. जास्त चांगला गेमिंग एक्सपिरीयन्स मिळणार असल्याने मोबाईलवर हा गेम खेळणारेही लाईट व्हर्जन कंप्युटरवर खेळायला लागतील आणि त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या स्किन्स वा बॅटल पासेसच्या खरेदीतून कंपनीला उत्पन्न मिळेल.
 
या गेमची एक वेगळी व्हर्जन चीनमध्ये उपलब्ध आहे. चीनमध्ये हा गेम - गेम फॉर पीस नावाने उपलब्ध आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments