तुम्ही ऑगस्टमध्ये जन्माष्टमी उत्सवासाठी तुमच्या तारखा सेट करू शकता तसेच संपूर्ण भारतातील या भव्य आणि कलात्मकदृष्ट्या सुंदर इस्कॉन मंदिरांना भेट देण्याची योजना करू शकता.
1.श्री मायापुर चंद्रोदय इस्कॉन मंदिर, मायापुर
श्री मायापुर चंद्रोदय मंदिर भारतातील सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे. हे इस्कॉनचे मुख्य मुख्यालय आहे. याची आधारशिला वर्ष 1972 मध्ये ठेवण्यात आली होती. तसेच जगातील सर्वात भव्य मंदिर बनवण्यासाठी इथे कार्य सुरु आहे. भव्य उत्सवादरम्यान हजारो पर्यटक मायापुर येथे येतात. श्रीकृष्णाला नवीन वस्त्र परिधान करून सजवले जाते, इथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. हे मंदिर पश्चिम बंगालमधील मायापूर मध्ये स्थित आहे.
2.श्री राधा कृष्ण इस्कॉन मंदिर, बँगलोर
भारतातील अद्भुत सौंदर्य असलेले इस्कॉन मंदिर बँगलोर मध्ये स्थित आहे. याला श्री राधा कृष्ण मंदिर म्हणून ओळखले जाते. इथे वर्षभरामध्ये अनेक पर्यटक येतात. इथे ऑगस्ट महिन्यातील जन्माष्टमीच्या उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मंदिराला नवीन नवीन रंगांनी सजवले जाते तसेच भव्य रोषणाई केली जाते. श्रीकृष्णाला भव्य नैवेद्य दाखवण्यात येतो. हे मंदिर कर्नाटक मधील बँगलोर मध्ये राजाजीनगर मध्ये स्थित आहे.
3.श्री कृष्ण बलराम इस्कॉन मंदिर, वृंदावन
वृंदावन मध्ये श्री कृष्ण बलराम मंदिर नावाने प्रसिद्ध हे भारतातील पहिले इस्कॉन मंदिर आहे. याचे निर्माण वर्ष 1975 मध्ये झाले आहे. प्रत्येक वर्षी जन्माष्टमी दिवशी वृंदावनच्या सर्व परिसरामधील अनुयायी इथे जमतात. हिंदू पौराणिक कथे अनुसार हे ते स्थान आहे जिथे भगवान कृष्ण मोठे झाले होते. हे भव्य मंदिर जगातील प्रत्येक व्यक्तीला आकर्षित करते. हे मंदिर उत्तर प्रदेशमधील वृंदावन मध्ये रमण रेती परिसरात स्थित आहे.
4. राधिकारमण-कृष्ण बलराम इस्कॉन मंदिर, दिल्ली
प्रसिद्ध राधा राधिकारमण-कृष्ण बलराम इस्कॉन मंदिर राजधानी दिल्लीच्या हृदय स्थळावर स्थित आहे. जन्माष्टमी पर्वावर कमीतकमी 7-8 लाख भक्त इथे एकत्रित होतात. आर्ट गॅलरीपासून ते रोबोट्स आणि डायोरामापर्यंत, हे ठिकाण केवळ एक मंदिर नाही तर सर्व लोकांना मनोरंजक पद्धतीने माहिती प्रदान करते. तसेच ज्यांच्याकडे इस्कॉनचे सदस्यत्व आहे त्यांना जन्माष्टमीच्या गर्दीच्या वेळी येथे काही विशेष सुविधा मिळतात. हे मंदिर नवी दिल्लीमधील संत नगरमध्ये स्थित आहे.
5.श्री राधा रासबिहारी इस्कॉन मंदिर, मुंबई
मुंबईतील श्री राधा रासबिहारी इस्कॉन मंदिर हे भारतातील 20 इस्कॉन मंदिरांपैकी एक आहे. इथे जन्माष्टमी मोठ्या उत्साहात भव्यदिव्य साजरी केली जाते. दिव्यांपासून ते फुलांच्या सजावटीपर्यंत आणि कृष्णाच्या कथांचे वर्णन करणारे, हे मंदिर सर्वत्र अनेक भक्तांना आकर्षित करते. हे मंदिर मुंबईमधील जुहूत असलेल्या म्हाडा कॉलोनी मध्ये नाहीत आहे.
6.राधा वृंदावनचंद्र इस्कॉन मंदिर, पुणे
पुण्यातील राधा वृंदावनचंद्र इस्कॉन मंदिरात ऑगस्टमध्ये जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी होते. तसेच इथे ऑगस्टच्या सुरुवातीला तयारी सुरू होते, मंदिराची साफसफाई केली जाते आणि नंतर श्रीकृष्णाला सजवले जाते. हे मंदिर पुण्यामधील कोंढवा मध्ये स्थित आहे.
7.राधा-मदनमोहन इस्कॉन मंदिर, हैद्राबाद
हैदराबादमधील राधा-मदनमोहन इस्कॉन मंदिर हे आणखी एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय इस्कॉन मंदिर आहे. तसेच हे दक्षिण भारतातील इस्कॉनचे मुख्यालय आहे. तसेच इथे सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सवांद्वारे जन्माष्टमी साजरी करते. हे मंदिर हैद्राबाद यामधील अबिड्स येथील हरे कृष्ण लँड जवळ स्थित आहे.
8.श्री राधा गोविंद इस्कॉन मंदिर, नोएडा
नोएडातील श्री राधा गोविंद मंदिर देखील पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अग्रसेन मार्गावर स्थित, ही एक उंच इमारत आहे, जरी ती त्याच्या भागांइतकी मोठी नाही. जन्माष्टमीच्या वेळी भाविक येथे भव्य आरती पाहण्यासाठी येतात. जन्माष्टमीला इथे भक्तिमय वातावरण असते. हे मंदिर फुलांनी आणि रोषणाईने सजवले जाते. हे मंदिर नोएडा मधील अग्रसेन मार्गावर स्थित आहे.
9.श्री राधा गोविंद धाम इस्कॉन मंदिर, अहमदाबाद
अहमदाबाद येथे श्री राधा गोविंद धाम ही एक सुंदर कलाकृती आहे. दरवर्षी जन्माष्टमीचा सण हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि आरतीमध्ये साजरा केला जातो. तसेच हरे कृष्ण मंदिर म्हणूनही ओळखले जाते,हे मंदिर मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करते. हरे कृष्णाच्या मंत्रोच्चारांसह सुंदर फुलांची सजावट आणि चमकणारे दिवे आणि प्रार्थना गीतांसह जन्माष्टमी इथे भव्य पद्धतीने साजरी केली जाते.हे मंदिर अहमदाबादमधील बीआरटीएस बस स्टॉप जवळ स्थित आहे.
10.गिरिधारी दाऊजी इस्कॉन मंदिर, जयपुर
राजस्थानमधील इस्कॉन मंदिरांची यादी जयपूरमधील गिरधारी दौजी मंदिरापासून सुरू होते. या मंदिरात भव्य कृष्णाच्या मूर्तीसह भव्य उपस्थिती आहे. जन्माष्टमीच्या वेळी संपूर्ण मंदिर दिवे आणि भव्य फुलांच्या सजावटीने उजळून निघते. तसेच भाविक जन्माष्टमी हा विशेष दिवस नाचून आणि हरे कृष्णाचा जप करून साजरा करतात. तसेच हे मंदिर जयपूर मधील मानसरोवर जवळ स्थित आहे.
11.श्री राधा मदनमोहन इस्कॉन मंदिर, उज्जेन
उज्जैनमधील श्री राधा मदनमोहन मंदिर त्याच्या सुंदर वास्तुकलेसाठी ओळखले जाते. तसेच उज्जैनचे लोक दरवर्षी जन्माष्टमी मोठ्या थाटामाटात साजरी करतात. भरभरून जेवणापासून ते भक्तांसाठी प्रार्थना आणि भजनापर्यंत; प्रत्येकजण उत्सवाचा भाग असतो. हे मंदिर उज्जेनमधील प्रशासकीय परिसरात स्थित आहे.
12.श्री राधा मदन मोहन इस्कॉन मंदिर, खारघर
मुंबईतील आणखी एक इस्कॉन मंदिर जे जन्माष्टमी उत्सवासाठी ओळखले जाते ते खारघरमधील श्री राधा मदन मोहनजी मंदिर आहे. हिरव्यागार परिसरात पसरलेले हे मंदिर हे मोठ्या संख्येने भक्त आणि पर्यटकांना आकर्षित करते. हे मंदिर नवीमुंबई मधील खारघर गोल्फ कोर्स मध्ये स्थित आहे.
13.श्री राधा मदन गोपाल इस्कॉन मंदिर, नाशिक
नाशिकमधील श्री राधा मदन गोपाळ मंदिर हे महाराष्ट्रातील आणखी एक महत्त्वाचे इस्कॉन मंदिर आहे. तसेच भजन कीर्तन, प्रार्थना आणि आरती वेळी भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थि राहतात. हे मंदिर जन्माष्टमीला भगवान कृष्णाचा जन्म साजरा करते. हे मंदिर नाशिकमधील व्दारका मध्ये स्थित आहे.
14.श्री गौर राधा कृष्ण इस्कॉन मंदिर, हरिद्वार
हरिद्वार हे सुंदर शहर गंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. तसेच हरिद्वारमधील प्रसिद्ध श्री गौर राधाकृष्ण मंदिर वर्षभर पर्यटकांना आकर्षित करते. तसेच जन्माष्टमी उत्सवाला देशाच्या विविध भागातून मान्यवर, भक्तगण आणि पर्यटक इथे हजेरी लावतात. हे मंदिर हरिद्वारमध्ये वैकुंठ धाम आश्रम मध्ये स्थित आहे.
15.मुक्तिधाम इस्कॉन मंदिर, नाशिक
मुक्तिधाम संकुलात भगवान कृष्णाला समर्पित मंदिर आहे. कृष्ण मंदिराच्या भिंतींवर प्रसिद्ध चित्रकार रघुबीर मूळगावकर यांनी कृष्णाच्या जीवनातील दृश्ये रेखाटलेली चित्रे आहेत. तसेच इथे वर्षभर अनेक पर्यटक भेट देतात. जन्माष्टमीला हे मंदिर सजवले जाते. हे मंदिर नाशिक मध्ये स्थित आहे.