सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

येथे केली जाते दानवांची पूजा

सर्वसाधारणपणे मंदिरातून देवदेवतांची पूजा केली जाते असा आपला समज आहे. मात्र हिंदू संस्कृतीत देवांबरोबरच गुणी दानवांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. याचे उदाहरण म्हणजे भारतात अनेक ठिकाणी दानव गणल्या गेलेल्यांचही पूजा केली जाते. त्यातील महत्त्वाची तीन मंदिरे उत्तरप्रदेशात आहेत तर चौथे मंदिर उत्तराखंडमध्ये आहे. 
उत्तरप्रदेशात कानपूरमध्ये दशानन मंदिर आहे. हे मंदिर रावणाचे आहे. 1890 मध्ये हे मंदिर बांधले गेले आहे. रावण हा असुर म्हणजे राक्षस होता असे मानले जाते. वर्षभर हे मंदिर बंद असते मात्र दसर्‍यादिवशी ते उघडले जाते व त्याच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. येथे रावणाची पूजा तो ज्ञानी होता म्हणून केली जाते. 
 
याच राज्यात गोकुळात पुतना राक्षशिणीचे मंदिर आहे. येथे पुतनेची पूजा केली जाते. कृष्ण कथांमध्ये पुतना कृष्णाला विषारी दूध पाजून ठार करण्यासाठी आली होती मात्र कृष्णानेच तिचा वध केला ही कथा येते. येथे पुतनाची झोपलेली मूर्ती असून तिच्या छातीवर स्तनपान करणार्‍या कृष्णाची मूर्ती आहे. येथे पुतना कृष्णाला मारण्यासाठी नाही तर त्याच्या आईचे स्वरूप म्हणून आली होती असे मानले जाते व त्यामुळे तिची मातृस्वरूपात पूजा केली जाते. 
 
महाभारतात राजा दुर्योधन हा खलनायक आहे. लक्षावधी लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यामुळे त्याला असुर मानले जाते. उत्तराखंडमधील नेटवार भागात दुर्योधनाचे मंदिर आहे. येथे त्याची देवतेप्रमाणे पूजा केली जाते. त्याच्याशेजारीच कर्णाचेही मंदिर आहे. दुर्योधनाची सोन्याची कुर्‍हाड जाखोली या गावातील देवळात पाहायला मिळते.